नवी दिल्ली : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार ते गेली अनेक दिवस आजारी होते. आज २६ फेब्रुवारी रोजी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते आणि ते कोणालाही भेटत नव्हते. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाबद्दल एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं आहे. यात त्यांनी लिहिलंय, ‘अत्यंत जड अंतःकरणाने, आपल्याला कळवताना दुःख होत आहे की, २६ फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाले. उधास परिवार.’ यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुजरातच्या जेतपूरमध्ये झाला होता जन्म
‘ये मेरे वतन के लोगो’ गीत त्यांनी गायले होते. त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. या गाण्याचे त्यांना बक्षीस म्हणून ५१ रुपये देण्यात आले होते. असे असले तरी नंतरच्या काळात त्यांनी आपल्या जादुई आवाजाने सिनेसृष्टीसह, रसिकांना मंत्रमुग्ध केले आणि यशाची शिखेर पादाक्रांत केली. त्यांचा जन्म १७ मे १९५१ मध्ये गुजरातच्या जेतपूरमध्ये झाला होता. त्यांनी अनेक सुपरहीट गाणे दिलेत. त्यासाठी ते लाखो रुपये चार्ज करायचे. आपल्या गजल गायनाचा कार्यक्रमसुद्धा ते ठरवतील त्यानुसार केला जायचा व त्याचे चार्जदेखील खूप असायचे. मीडिया रिपोर्टनुसार ते २४ ते २५ कोटी रुपयांचे मालक होते.
आपल्या भावडांकडून घेतला गाण्याची प्रेरणा
उधास यांचा जन्म एका जमीनदार कुटुंबात झाला होता. ते तीन भावांमध्ये सर्वात छोटे होते. त्यांचे मोठे बंधू मनहार उधास चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक होते. त्यांचे दुसरे बंधू देखील प्रसिद्ध गझल गायक होते. त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडून गाण्याची प्रेरणा घेतली होती.
‘ऐ मेरे वतन के लोगो’ पहिले गाण गायलं
मनहार जेव्हा व्यासपीठावर गाणं सादर करत होते. तेव्हा पंकज उधास हे पाच वर्षांते होते. भावाकडून प्रेरणा घेत त्यांनी सुद्धा गायक होण्यामध्ये आवड दाखवली. त्यामुळे वडिलांनी त्यांना एका म्युझिक इन्स्टिट्यूटमध्ये टाकलं. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धात त्यांनी पहिल्यांदा व्यासपीठावर कला सादर केली होती. यावेळी त्यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गायलं होतं. लोकांना त्यांच्या तोंडून घे गाणं खूप आवडलं. यावेळी एकाने त्यांना ५१ रुपये बक्षीस दिलं होतं.