(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रेमाच्या स्टॉपवर थांबावंसं वाटत असतं. काही व्यक्ती या प्रेमाच्या स्टॉपवर थांबतात, काही रमतात, तर काही भेटतात पण या सगळ्यात प्रत्येकाचा प्रवास पुढे चालूच असतो. पण त्या स्टॉप वरचं रेंगाळण मनात तसंच राहतं. अशीच प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट असलेला “लास्ट स्टॉप खांदा” हा संगीतमय चित्रपट २१ नोव्हेंबर संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. पोस्टर मध्ये दोन प्रेमी पाठमोरे चालताना दिसत आहेत. पोस्टर खूपच सुंदर आहे. आणि चाहत्यांना त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.
रोझलिन खान सायबर क्राईमची शिकार, आधार कार्डच्या कोडवरून झाली फसवणूक; काय आहे प्रकरण
शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी “लास्ट स्टॉप खांदा” प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदिप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केले आहे.
चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश करपेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचे छायांकन हरेश सावंत यांनी केले असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर यांनी केले आहेत. श्रेयस राज आंगणे, श्रमेश बेटकर लिखित गीतांना श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचे संगीत लाभले आहे.
Rakesh Roshan: ‘क्रिश’चा मास्क बनवण्यासाठी लागले ‘इतके’ महिने, राकेश रोशन यांनी केला खुलासा
प्रेमाच्या नात्याचा वेध आजवर अनेक चित्रपटांमधून लागला गेला आहे. तरीही प्रेम या संकल्पनेच्या नवनव्या गोष्टी चित्रपटांतून मांडल्या जात असतात. “लास्ट स्टॉप खांदा…” प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटातूनही अशीच एक नावीन्यपूर्ण गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या गोष्टीला श्रवणीय संगीताचीही साथ मिळाली आहे. चित्रपटातून एक तरुण आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट उलगडणार असून प्रत्येकाला रीलेट होईल अशीच ही गोष्ट आहे. नव्या दमाचे कलाकार, उत्तम कथा, तांत्रिकदृष्ट्या सकस असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.