Photo Credit - X
New Film Releasing this Week: ऑगस्ट महिना संपायला काही दिवस उरले आहेत आणि या शेवटच्या आठवड्यात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ओटीटीसह या आठवड्यात चित्रपटगृहांमध्येही मोठी धमाल होणार आहे. जसजसा शुक्रवार जवळ येत आहे, तसतशी चित्रपटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या आठवड्यात मोठ्या पडद्यावर रोमान्स, हॉरर आणि ड्रामा असे विविध प्रकारचे चित्रपट पाहता येणार आहेत. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर हे ‘धांसू’ चित्रपट तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जाह्नवी कपूर यांची ही रोमँटिक कॉमेडी प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. चित्रपटाच्या रिलीजआधीच गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षक या नव्या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ही एका पंजाबी मुलाची आणि दक्षिण भारतीय मुलीची प्रेमकथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले असून, निर्मिती दिनेश विजान यांच्या ‘मॅडॉक फिल्म्स’ने केली आहे.
यशपाल शर्मा, मुश्ताक पाशा आणि मृदुला महाजन यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दोन व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्यांचे आयुष्य देशविरोधी कारवायांच्या खोट्या आश्वासनांमुळे उद्ध्वस्त होते. हा चित्रपट त्यांचे वेगळे प्रवास आणि त्यांच्या निर्णयांचे गंभीर परिणाम दर्शवतो. ‘ये है मेरा वतन’ हा चित्रपटही २९ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
२०२३ च्या सुपरहिट गुजराती चित्रपट ‘वश’चा हा सिक्वेल आहे. ‘वश लेव्हल २’ हिंदीमध्येही रिलीज होत आहे. कथा अथर्वने आपल्या मुलीला वाईट शक्तींपासून वाचवल्यानंतर १२ वर्षांनी सुरू होते. सिक्वेलमध्ये त्याला कळते की, त्या वाईट शक्तींनी त्याला कधीच सोडले नाही आणि त्याला पुन्हा त्या काळ्या जादूगाराशी लढण्यास भाग पाडते. हा चित्रपट अजय देवगण आणि आर माधवन यांच्या ‘शैतान’ या चित्रपटाशी साधर्म्य साधतो.