इंदौर: व्हॅलेंटाईन वीकचा (Valantine Week) दुसरा दिवस प्रपोज डे (Propose Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बरेच जण ज्याच्यांवर प्रेम आहे त्यांना प्रपोज करतात. कुणी हे प्रपोजल (Proposal) स्विकारत किंवा कुणी नाकारतं. मात्र, एका तरुणाकडून आलेलं लग्नाच प्रपोजल नाकारणं एका तरुणीच्या चांगलच महागात पडलं आहे. नकार मिळाल्याने संतापलेल्या तरुणाने गोळीबार केला यावेळी ती गोळी तिच्या सहकाऱ्याला लागल्याने नाहक त्याचा जीव गेला.
प्रपोज-डे (8 फेब्रुवारी) ला कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीला आरोपी राहुल यादव (23) याने लग्नासाठी प्रपोज केलं. मात्र तिने नकार दिल्याने तरुणाने तिला धमकावले आणि देशी बनावटीच्या बंदुक तिच्यावर रोखून धरली. यावेळी तिच्या बचावासाठी आलेल्या तिच्या सहकाऱ्याला गोळी लागली.संस्कार वर्मा (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणाच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या लोकांनी गुरुवारी पोलिस नियंत्रण कक्ष गाठून निषेध केला. फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करून फाशी द्यावी, अशी मागणी करत आंदोलन केलं
गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) स्टेशनचे प्रभारी सुरेश हातेकर यांनी सांगितले की,याने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरुन बुधवारी सायंकाळी उशिरा रेल्वे स्टेशन परिसरात हत्येची घटना घडली. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत उपस्थित असलेला तिचा सहकारी याने संस्कारने मध्यस्थी केली असता, संतापलेल्या यादवने देशी बंदुक चालवली. त्यातून निघालेली गोळी वर्मा यांच्या डोक्यात लागली. गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या वर्मा यांचा गुरुवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर यादव कुटुंबासह फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.