Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mughal History : मोठी बातमी! इतिहासाच्या पुस्तकातून मुघल इतिहास हटवला; महाकुंभ, प्रयागराजचा समावेश

NCERT ने इयत्ता ७ वीच्या सामाजिक विज्ञानाच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. नवीन पुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीच्या सत्तेसंबंधी अध्याय हटवले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 27, 2025 | 10:42 PM
मोठी बातमी! पाठ्यपुस्तकांमधून मुघल इतिहास हटवला; महाकुंभ, प्रयागराजचा समावेश

मोठी बातमी! पाठ्यपुस्तकांमधून मुघल इतिहास हटवला; महाकुंभ, प्रयागराजचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:

NCERT ने इयत्ता ७ वीच्या सामाजिक विज्ञानाच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. नवीन पुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीच्या सत्तेसंबंधी अध्याय हटवण्यात आले असून त्याऐवजी प्राचीन राजवंश, पवित्र भूगोल (Sacred Geography) आणि ‘मेक इन इंडिया’ व ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या सरकारी योजनांवर आधारित नवीन अध्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. हे बदल नवी शिक्षणधोरण (NEP) आणि २०२३ मधील नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन (NCFSE) नुसार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये भारताच्या परंपरा, ज्ञानप्रणाली आणि स्थानिक संदर्भांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला आहे.

Indus Waters Treaty : भारत खरंच सिंधू नदीचं पाणी रोखेल का? सरकारच्या दाव्यात किती तथ्य? वाचा सविस्तर

NCERT च्या सध्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा पहिला भाग उपलब्ध आहे. दुसरा भाग पुढील काही महिन्यांत येणार आहे. याच दरम्यान अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलेले नाही की हटवलेले अध्याय पुढील भागात समाविष्ट होतील की नाही. नवीन पुस्तक “Exploring Society: India and Beyond” मध्ये आता मौर्य, मगध, शुंग आणि सातवाहन यांसारख्या प्राचीन भारतीय राजवंशांवर आधारित अध्याय आहेत.

तीर्थयात्रांवरही भर

नवीन पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना ‘How the Land Becomes Sacred’ या अध्यायामधून भारतातील धार्मिक स्थळे आणि तीर्थयात्रांविषयी माहिती दिली जाते. यामध्ये चारधाम यात्रा, १२ ज्योतिर्लिंग, शक्ती पीठे तसेच नद्यांचे संगम, डोंगर आणि अरण्य यांना पवित्र स्थळ म्हणून दर्शवण्यात आले आहे. अलीकडे प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या ६६ कोटी भाविकांचा उल्लेखही पुस्तकात आहे. मात्र,तिथे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटना किंवा मृत्यूंचा उल्लेख केलेला नाही.

Pahalgam Terror Attack: भारताकडे अग्नी, ब्राह्मोस तर पाकिस्तानकडे गौरी, शाहीन; क्षेपणस्त्रांत कोण किती पावरफुल?

विरोधकांकडून  भगवाकरणाचा आरोप

पाठ्यपुस्तकांमधील या बदलांवर विरोधी पक्षांनी टीका केली असून ‘भगवाकरण’ करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. गेल्या वर्षी NCERT चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी एका मुलाखतीत, मुलांना दंगलींबद्दल शिकवल्यास ते नकारात्मक गोष्टी शिकतील आणि तशाच प्रकारचे नागरिक बनतील, असं वक्तव्य केलं होतं.

Web Title: Government remove mughal empire history and delhi rule in ncert book added mahakumbh and prayagraj topic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 10:40 PM

Topics:  

  • India History
  • Mahakumbh Mela
  • mughal

संबंधित बातम्या

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते
1

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते

देशातील ‘या’ बँकेत भारतीयांनाच नव्हता प्रवेश; जाणून घ्या कोणती आहे ही बँक
2

देशातील ‘या’ बँकेत भारतीयांनाच नव्हता प्रवेश; जाणून घ्या कोणती आहे ही बँक

कसा रचला गेला मुंबई लोकल ट्रेनचा पाया? जाणून घ्या संपूर्ण इतिहास
3

कसा रचला गेला मुंबई लोकल ट्रेनचा पाया? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Shivrajyabhishek Din:  हिंदवी स्वराज्य संस्थापकांचा 352 वा शिवराज्याभिषेक दिन ,  या घटनेचा इतिहास तुम्हाला माहितेय का ?
4

Shivrajyabhishek Din: हिंदवी स्वराज्य संस्थापकांचा 352 वा शिवराज्याभिषेक दिन , या घटनेचा इतिहास तुम्हाला माहितेय का ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.