नवी दिल्ली – अभिनेत्री कंगना रनौत मथुरा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची अटकळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी भाजपच्या विद्यमान खासदार व बॉलिवूड अभिनेत्री हेमामालिनी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मथुरेत सर्वजण चित्रपट स्टारच हवेत का. मथुरेचा खासदार होणाऱ्याला तर तुम्ही होऊ देणार नाही. उद्या राखी सावंतलाही पाठवणार.”
खासदार हेमामालिनी शनिवारी मथुरेत होत्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना कंगना रनौत मथुरेतून निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया मागितली. त्यावर त्या म्हणाल्या – “खूप चांगली गोष्ट आहे. मी माझे मत काय सांगू. माझे विचार देवावर आहेत. लॉर्ड कृष्णा विल डू इट व्हॉट यू वाँट. येथे फिल्म स्टारच हवे असल्याचे तुमच्या डोक्यात बसले आहे. तुम्हाला मथुरेत सर्व फिल्म स्टारच हवेत?.”
भाजप खासदार हेमामालिनी यांनी मथुरा लोकसभा मतदार संघातून दोनवेळा विजय मिळवला आहे. २०१४ त्यांनी रालोद प्रमुख जयंत चौधरी यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ त्यांनी रालोदच्याच नरेंद्र सिंह यांना धूळ चारली होती. आता २०२४ वडणुकीपूर्वी या मतदार संघात कंगनाच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.