भारत आणि म्यानमार (Myanmar) सीमेवर आता सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. बांगलादेशप्रमाणे (Bangladesh) म्यानमार सीमेवर (India and Myanmar border) देखील संपूर्णपणे कुंपण घालण्यात येणार आहे. याआधी दोन्ही देशांमध्ये मुक्त संचार होता. मात्र यापुढे त्यावर देखील बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी दिली आहे. म्यानमारमधून भारतामध्ये घुसखोरी वाढल्यामुळे केंद्र सरकारने(Government of India) पाऊले उचलली आहेत.
म्यानमारमधून भारतातील मिझोराममध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. दोन्ही सीमेदरम्यान मुक्तसंचार असल्यामुळे या घुसखोरीवर कोणताही ताबा नव्हता. मागील काही महिन्यांमध्ये म्यानमारचे 600 सैनिकांनी आणि नागरिकांनी भारतामध्ये घुसखोरी केली. यामुळे भारत म्यानमार सीमेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सीमा सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे देशाची सीमा बदलणे सहज शक्य होणार नसल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सीमा सुरक्षेवर मत व्यक्त करत म्यानमार सीमेवर कुंपण घातले जाणार असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना शहा म्हणाले, “भारत आणि म्यानमार बॉर्डर ही सीमा याआधी सर्वांसाठी खुली होती, पण यापुढे त्याला फेन्सिंग केले जाणार आहे. घुसखोरी आणि म्यानमारमधून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सरकार दोन्ही देशांमधील मुक्त संचारही बंद करणार आहे.” अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.