खोट्या प्रतिष्ठेच्या नावावर मुलीच्या पतीची हत्या करण्याची घटना हैदराबादमध्ये घडली होती. या घटनेला १५ दिवस नाही उलटतं तोच आता गुजरातमध्ये ऑनर किलिंगची (Honor Killing) घटना उघडकीस आली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून वधुपक्षाने जावयाची हत्या केली तर याचा बदला घेण्यासाठी संतापलेल्या वरपक्षाने सुनेच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गुजरातच्या जामनगर मध्ये हा सगळा रक्तरंजित थरार घडला आहे. हापा योगेश्वर धाम परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय सोमराजनं परिसरातच राहणाऱ्या रुपलेखासोबत लग्न झालं होतं. सोमराज चरण समाजाचा तर रुपलेखआ क्षत्रिय समाजाची असल्याने दोन्ही कुटुंबाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मुलीनं आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या कटुंबियांनी तरुणाचा खून केला. तर, मुलाच्या हत्येमुळे व्यथित झालेल्या कुटंबियांनी त्याच्या सासरी जात सुनेच्या आईची हत्या केली.
[read_also content=”मनासारखी पत्नी मिळाली नाही म्हणून नैराश्यातून पतीची आत्महत्या https://www.navarashtra.com/maharashtra/husband-commits-suicide-due-to-depression-nrps-280966.html”]