रमजान महिना (Ramdan) सुरु झाला असून मोठ्या प्रमाणावर लोकं उपवास करतात. मंगळवारी रमजानच्या पहिल्या दिवशी उपवास सोडल्यानंतर हैदराबादच्या एका रेस्टांरने मोफत हलीम देण्याचा निर्णय घेतला . याबाबत कळताच लोकांनी मोफत हलीम खाण्यासाठी मोठी गर्दी केली. पाहता पाहता ही गर्दी इतकी वाढली की तिथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या गर्दीचा सामना करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं. सुरुवातीला सुरक्षा दलांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला
[read_also content=”बेंगळुरू रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी एका संशयिताला NIA ने केली अटक! https://www.navarashtra.com/latest-news/nia-arrests-a-suspect-in-bengaluru-rameswaram-cafe-blast-case-514916.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या मलकपेठ येथील एका रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. रेस्टॉरंट व्यवस्थापनाने रमजानच्या पहिल्या दिवशी लोकांना मोफत हलीम देण्याचा निर्णय घेतला, परंतु गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. पीटीआय या वृत्तसंस्थेने आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. मोफत हलीमच्या शोधात शेकडो लोक रेस्टॉरंटच्या बाहेर जमलेले आहेत. ही घटना मध्यरात्रीनंतर 2 च्या सुमारास घडली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालकपेटचे निरीक्षक यू श्रीनिवास यांनी सांगितले की, रहदारीला अडथळा आणल्याबद्दल रेस्टॉरंट व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला जाईल. फ्री ऑफरबाबत पोलिसांना माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या संख्येने लोक येण्याची शक्यता पाहता रेस्टॉरंट चालकांनी परवानगीही घेतली नाही. त्यामुळे जनजीवन प्रभावित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
रमजानच्या महिन्यात हैदराबादमध्ये हमखास मिळणार हलीम हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे. डाळी, गहू, मसाले आणि मांस यांचे मिश्रण करून हा पदार्थ तयार करण्यात येतो.






