नवी दिल्ली : पुढील वर्षी 2024 साली लोकसभा निवडणूका (Lok Sabha elections) होणार आहेत, मात्र त्याची तयारी व मोर्चेबांधणीला आत्तापासून अनेक पक्षांनी सुरुवात केली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात शिंदे गटाने व अजित पवारांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या निवडणुका होत आहेत, त्यामुळं कोणाला किती जागा मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान, आता जर देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर याबाबत एक सर्व्हे समोर आला आहे. पाहूया यात कुणाला किती जागा मिळताहेत… (If the Lok Sabha elections are held today…, who will come out on top? 11 for Thackeray group and how many for Shinde? Read what the survey says)
कुणाला किती जागा मिळणार
दरम्यान, इंडिया टीव्ही सीएनएक्सने हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेच्यानुसार अनेक राज्यात एनडीए आणि इंडिया आघाडीत थेट लढत होणार आहे. तर एनडीएला सर्वांधिक म्हणजे तीनशेपेक्षा अधिक जागा मिळतील, असं म्हटलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला यावेळी तीनपट जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. तर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा एकदा केंद्रात येणार असल्याचंही या सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे. एनडीए 318 जागा मिळतील, असं सर्व्हेतून समोर आलं आहे. तर बीजेपी- 290 काँग्रेस- 66 आप-10 टीएमसी-29 बीजेडी-13 शिवसेना शिंदे- 02 शिवसेना उद्धव- 11 एसपी- 04 आरजेडी- 07 जेडीयू- 07 एआईएडीएमके- 08 एनसीपी- 04 एनसीपी अजित- 02 वायएसआरसी- 18 टीडीपी- 07 लेफ्ट फ्रंट- 08 बीआरएस- 08 इतर- 30
महाराष्ट्रात काय होणार?
महाराष्ट्रात लोकसभेसाठी एकूण ४८जागा आहेत, यामध्ये भाजपाला २२ जागा मिळतील तर या सर्व्हेतून उद्धव ठाकरे यांना मोठा फायदा होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला 11 जागा मिळताना दिसत आहेत. तर शिंदे गटाला फक्त 2 जागा मिळताना दिसत आहेत. शिंदे गटाकडे एकूण 13 खासदार आहेत. या सर्व्हेनुसार ठाकरे गटाचे 11 खासदार निवडून येणार आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांना सहा जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस फार काही प्रभाव पाडू शकणार नाही. असं दिसतंय.






