Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा खेळ हवामानाचा! Pune शहरात अचानक थंडी ओसरली; तापमानात वाढ होण्याचे कारण काय?

पुणे आणि परिसरात गुरुवारी (ता. १९)  किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. तर  कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 18, 2026 | 09:11 PM
हा खेळ हवामानाचा! Pune शहरात अचानक थंडी ओसरली; तापमानात वाढ होण्याचे कारण काय?

हा खेळ हवामानाचा! Pune शहरात अचानक थंडी ओसरली; तापमानात वाढ होण्याचे कारण काय?

Follow Us
Follow Us:

पुण्यात किमान तापमानात वाढ 
ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली
हवामानात फारसा बदल होणार नसल्याची शक्यता

पुणे: पुणे शहरात गेल्या २४ तासांत किमान तापमानात मोठी वाढ झाली असून, शहरातील थंडी ओसरली आहे. मंगळवारी किमान तापमानात  वाढ नोंदवण्यात आली आहे. तर पुढील तीन ते चार दिवस हवामानात फारसा बदल होणार नसल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणे शहरातील उकाड्यात वाढ कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

शहर आणि परिसरात बुधवारी (ता. १८) १७.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान तर ३२.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडले होते. संध्याकाळी सामान्यतः ढगाळ वातावरण होते. तापमानामध्ये वाढ झाली असल्याने दुपारी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न

पुणे आणि परिसरात गुरुवारी (ता. १९)  किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. तर  कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर १६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (ता. २०) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार असून आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

तापमानातील चढउतार आणि ढगाळ वातावरण अशा बदलाबाबत भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे वैज्ञानिक ‘डी’ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, ‘‘सोमवारी रात्रीपासून हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातच रात्री ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे जमीनीकडून उत्सर्जित होणारी उष्णता वातावरणातच रोखली गेली. यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होऊन उबदारपणा जाणवू लागला आहे. प्रामुख्याने दक्षिणेकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. तापमानातील ही तफावत सरासरीपेक्षा सुमारे २ अंशांनी अधिक आहे. तापमानातील हे बदल या दिवसांमध्ये नैसर्गिक असून सरासरीच्या तुलनेत त्यात फार मोठी तफावत नाही.’’

“हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

भारतात पुन्हा पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांत तापमान वाढत असल्याचे चित्र असतानाच मंगळवारी (17 फेब्रुवारी) अचानक गारवा जाणवू लागला. हवामानातील हा बदल सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या पश्चिमी विक्षोभामुळे पाकिस्तान आणि उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये बुधवारपर्यंत पावसाची क्षेत्रे निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे.

Web Title: Winter season over and summer started pune marathi weather update news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?
1

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?

Maharashtra Rain Alert: आनंदी आनंद गडे! पुण्याला झोडपले तर उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी अन्…
2

Maharashtra Rain Alert: आनंदी आनंद गडे! पुण्याला झोडपले तर उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी अन्…

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
3

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
4

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.