pm narendra modi

  Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी रामटेक येथे आले होते. त्यांनी भाषणाला सुरुवातच मराठीमधून केली. प्रति आयोध्या असणाऱ्या रामटेकमध्ये प्रभू रामाचे स्मरण करीत येथील महापुरुष रघुजी भोसलेंना त्यांनी वंदन करीत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करीत तुमचे एक-एक मत म्हणजे विरोधकांना शिक्षा असल्याचे सांगितले.

  कॉंग्रेसकडून देशाला कायम विभाजित करण्याचे काम

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. कॉंग्रेस गठबंधन सरकारने देशाला कायम विभाजित ठेवण्याचे काम केले, असा घणाघाती हल्ला केला. आतापर्यंत कॉंग्रेसने देशाचे तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोपसुद्धा केला. हिंदी गठबंधनवाले देशाला विभाजित करण्यासाठी टपलेले आहेत. कॉंग्रेस गठबंधन देशाला फोडायचे काम करतात. हे विरोधी गठबंधनवाले ताकदवान झाले तर देशाला खंडखंड करून टाकतील.

  विरोधकांना सनातनी संस्कृती आवडत नाही

  आजसुद्धा यांना भारतीय संस्कृतीवर हल्ला करण्याचे एकही संधी सोडत नाही. विरोधकांना सनातनी संस्कृती आवडत नसल्याची बोचरी टीका त्यांनी केली. त्यामुळे भाजपला मतदान करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रभू श्रीराम एवढ्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भव्य मंदिरात दर्शनासाठी उपलब्ध झाले, हे भाजप सरकारचे मोठे काम असल्याचे त्यांनी सांगितले.

  संविधानाचे एवढे महत्त्व होते तर…..
  त्याचबरोबर संविधानावरून विरोधक देशाला मुर्ख बनवत असल्याचे सांगितले. जर यांना संविधानाचे एवढे महत्त्व होते तर त्यांनी देशात सर्व ठिकाणी संविधान का लागू केले नाही. जर संविधान एवढे प्रिय होते तर बाबासाहेबांना भारतरत्न देण्यापासून का रोखण्यात आले.

  मोदींच्या योजनेमुळे 25 कोटी जनता गरिबीतून बाहेर

  मोदीच्या अनेक योजनेमुळे एसटी, एनटी, आदिवासींना लाभ झाला. त्यामुळे 25 कोटी गरिबीतून बाहेर पडले. जर तुमच्यासाठी संविधान महत्त्वाचे होते. तर देशात सगळीकडे संविधान लागू का नाही केले. आर्टीकल 370 का हटवले नाही. मोदी आर्टिकल 370 हटवल्याने देशाचा काय फायदा झाला हे कॉंग्रेसची व्होट बॅंकेचे राजकारण असल्याचा मोठा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.