Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम बंगालमध्ये मतदारांवर टांगती तलवार! निवडणुकीच्या तोंडावर 91 लाख लोकांची ओळख गेली पुसल्या

निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेनंतर पश्चिम बंगालमध्ये ९०.८३ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मुर्शिदाबाद आणि उत्तर २४ परगणा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नावे वगळण्यात आली आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 07, 2026 | 01:58 PM
In West Bengal names of 90 lakh voters were excluded due to the SIR

In West Bengal names of 90 lakh voters were excluded due to the SIR

Follow Us
Follow Us:

West Bengal Elections 2026 : बंगाल : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा बंगालची रंगली आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि मतता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची सत्ता आहे. ममतादीदींच्या गडाला तडा देणे हे भाजपसमोर मोठे आव्हान आहे. मात्र राजकीय लढ्यापेक्षा ममतादीदींसमोर SIR चे आव्हान आहे. यामुळे बंगालमधील अनेक लोकांच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सर्वसामान्य माणसासाठी, त्याचे मतदार ओळखपत्र हे केवळ त्याच्या मतदानाच्या हक्काची हमी नसून, या देशातील त्याच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा आहे. परंतु आज, पश्चिम बंगालमधील ९०,८३,३४५ लोकांवर आपली ओळख गमावण्याची टांगती तलवार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीनुसार, राज्यातील मतदारांच्या एका मोठ्या लोकसंख्येला यादीतून वगळण्यात आले आहे. या प्रचंड संख्येमुळे केवळ राजकीय वर्तुळातच खळबळ माजली नाही, तर सीमावर्ती जिल्ह्यांमधील लाखो कुटुंबे आपल्याच देशात आता आपल्याला ‘बेकायदेशीर’ मानले जाईल की काय, या चिंतेत आहेत. यामुळे बंगालमध्ये निवडणुकीच्या तोंडावर ओळखपत्राचा घोळ निर्माण झाला आहे.

हे देखील वाचा : कोण होणार केरळचा किंगमेकर? जनमत चाचणीत धक्कादायक आकडेवारी समोर

मुर्शिदाबाद आणि २४ परगणा जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

बंगालमधील आकडेवारीतील वास्तव अत्यंत चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, अल्पसंख्याकबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, तेथून ४,५५,१३७ नावे वगळण्यात आली आहेत. यानंतर उत्तर २४ परगणा जिल्ह्याचा क्रमांक लागतो, जिथे ३,२५,६६६ लोक आता मतदार राहिलेले नाहीत. कूचबिहार, उत्तर दिनाजपूर, मालदा आणि दक्षिण २४ परगणा यांसारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमधूनही मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली आहेत. सखोल तपासणीनंतर न्यायालयीन अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, लाखो लोकांनी मतदार यादीतील आपली पात्रता गमावली आहे.

हे देखील वाचा :  विरोधी पक्षांना मोठा धक्का! मुख्य निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar यांच्याविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला

या नावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता

ही संपूर्ण प्रक्रिया एसआयआर (SIR) अंतर्गत पार पाडण्यात आली. अहवालानुसार, एकूण ६०,०६,६७५ प्रकरणे न्यायालयीन छाननीखाली होती, त्यापैकी ५९,८४,५१२ प्रकरणांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यापैकी, २७,१६,३९३ मतदारांना न्यायालयीन अधिकाऱ्यांनी निर्वासनासाठी पात्र ठरवून त्यांची नावे हटवण्यात आली. चिंताजनक बाब म्हणजे, २२,१६३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, परंतु त्यांच्यावर डिजिटल स्वाक्षरी होणे बाकी आहे; ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हटवलेल्या नावांची संख्या आणखी वाढू शकते.

अपील करण्याची अंतिम संधी

मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्यानंतर, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, ज्या मतदारांची नावे वगळण्यास पात्र असल्याचे आढळले आहे, त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी आणि अपील करण्यासाठी एक अंतिम संधी मिळेल. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येत आहेत; मतदानाचा पहिला टप्पा २३ एप्रिल रोजी (१५२ जागा) आणि दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी (१४२ जागा) होणार आहे. निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर केला जाईल.

Web Title: In west bengal names of 90 lakh voters were excluded due to the sir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • SIR
  • West bengal

संबंधित बातम्या

Supreme Court Hearing Gyanesh Kumar SIR Case: ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; निलंबनास नकार, केंद्राला नोटीस
1

Supreme Court Hearing Gyanesh Kumar SIR Case: ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; निलंबनास नकार, केंद्राला नोटीस

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
2

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Chiplun News : SIR विरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा; ७ ऑक्टोबरला चिपळुणात आंदोलन, भास्कर जाधव यांचे तरुणांना आवाहन
3

Chiplun News : SIR विरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा; ७ ऑक्टोबरला चिपळुणात आंदोलन, भास्कर जाधव यांचे तरुणांना आवाहन

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे
4

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.