
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचे सर्च ऑपरेशन
किश्तवाडमध्ये लष्कराने परिसर वेढला
जैश ए मोहम्मद विरुद्ध सर्च ऑपरेशन
जम्मू काश्मीर राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरुद्ध आपली मोहीम तीव्र केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरुद्ध सर्च ऑपरेशन राबवले आहे. दरम्यान हे सर्च ऑपरेशन आज देखील सुरू आहे. त्यामुळे किश्तवाडमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांनी परिसर वेढला आहे.
किश्तवाड जिल्ह्यातील मंडल सिंहपोरा सोनार गावात जैश ए मोहम्मदचे दोन, चार दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली आहे. त्यानंतर सुरक्षा दलाने या गावाला चारही बाजूने वेढा घातला आहे. दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी लष्कराने आधुनिक हत्यारांचा वापर करत आहे.
दहशतवादी घनदाट जंगलात लपले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. लष्कराने दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधला आहे. हा परिसर 12000 फुट उंचीवर असल्याने भारतीय लष्कर ड्रोन्स आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर करत आहे. याच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
हाय अलर्ट! Republic Day वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; खलीस्तानी अन्… , राजधानीत चोख बंदोबस्त
सर्च ऑपरेशनच्या पहिल्या दिवशी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तुकडीवर अचानक गोळीबार केला. या चकमकीत एक जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले. तसेच या सर्च ऑपरेशनमध्ये जखमी झालेल्या जवानांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Republic Day वर दहशतवादी हल्ल्याचे सावट
भारतात सध्या प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू आहे. राजधानी दिल्लीत पथसंचलनाची तयारी सुरू आहे. दरम्यान भारताच्या प्रजासत्ताक दिनावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचा अंदाज गुप्तचर यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे. सीमेपलीकडून भारताविरुद्ध मोठा कट शिजवला जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सीमेपलीकडून एक अत्यंत घातक आणि हायब्रिड असा कट रचला जात असल्याचे माहिती समोर येत आहे. सीमेपलीकडे असलेले दहशतवाद्यांचे आका आता भारतीय गुंडांना ‘फुट सोल्जर’ म्हणून वापरुन दिल्ली एनसीआर सह अन्य महानगरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी आणि हायब्रिड ‘फुट सोल्जर’ सुरक्षा यंत्रंणासाठी एक आव्हान ठरते आहे. पाकिस्तान आणि कॅनडासारख्या देशातील खलिस्तानी नेता भारतात घुसखोरी करण्याऐवजी देशातील स्थानिक गुन्हेगारांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.