जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक (Photo Credit- X)
नेमकी घटना काय?
बिल्लावार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामड नाला येथे दुपारी ४ च्या सुमारास स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या. या भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळताच, पोलिसांच्या SOG (Special Operations Group) पथकाने तातडीने परिसराला वेढा घातला. शोध मोहीम सुरू असतानाच, लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
#BREAKING: Encounter breaks out between Pakistan sponsored terrorists and security forces in Kathua of Jammu & Kashmir. J&K Police SOG Kathua has engaged terrorists in the forests of Kamadh Nullah, Kathua. CASO was underway since morning. More details are awaited. — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 7, 2026
जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…
मोठे ऑपरेशन: वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
हे २०२६ मधील पहिले मोठे लष्करी ऑपरेशन असल्याचे मानले जात आहे. या ऑपरेशनचे गांभीर्य लक्षात घेता आयजी जम्मू भीम सेन तुती स्वतः या मोहिमेवर लक्ष ठेवून असून त्यांनी चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एसएसपी कठुआ मोहिता शर्मा या देखील प्रत्यक्ष घटनास्थळावरून परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत. दहशतवाद्यांना पळून जाण्याची संधी मिळू नये म्हणून गावात अतिरिक्त सैन्य तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त
या चकमकीच्या पार्श्वभूमीवर, नुकतेच बारामुल्ला जिल्ह्यातील शेरी भागातील सुचलीवारन जंगलात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे एक मोठे लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले होते. तिथून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. यानंतर आता कठुआमधील ही चकमक सुरक्षा दलांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याचा गुन्हेगार कोण? एनआयएच्या आरोपपत्रात तीन नावे समोर






