Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’; ‘चिनाब’वरील बगलिहार डॅमचे दरवाजे बंद, शत्रूराष्ट्राची पाण्यासाठी वणवण

चिनाब नदीचे पाणी अडवल्याने पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतात पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची अडचण होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 05, 2025 | 03:18 PM
भारताची पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'; बगलिहार डॅम बंद करत चिनाबचे पाणी रोखले, शत्रूराष्ट्राची दाणादाण

भारताची पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'; बगलिहार डॅम बंद करत चिनाबचे पाणी रोखले, शत्रूराष्ट्राची दाणादाण

Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानची बोबडी वळली आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. व्यापार बंद करण्यात आला आहे. मात्र आता भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केली आहे. भारताने चिनाब नदीचे पाकिस्तानकडे जाणारे पाणी बंद केले आहे. बगलिहार धंरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

पहलगाम हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने कोणतीही सैन्य कारवाई न करता पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तान चवताळला आहे. भारताने आता वॉटर स्ट्राईक करत चिनाब नदीवर असलेले बगलिहार धरणाचे पाणी अडवले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक भागात पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.

चिनाब नदीचे पाणी अडवल्याने पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतात पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची अडचण होणार आहे. जर का भारताने झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे देखील दरवाजे बंद केले तर पाकिस्तानचे पाण्याविना हाल होणार आहेत.

बगलिहार डॅम बंद करण्याचा फायदा भारतालाच

पहलगाम हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच चिनाब नदीचे पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे हाल होणार आहेत. मात्र पाणी अडवण्याचा फायदा भारतालाच होणार आहे. बगलिहार धनर चिनाब नदीवर आहे. जे भारतासाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. धरणाचे दरवाजे बंद करण्याचा फायदा भारताला होणार आहे. यामुळे जम्मू-काश्मीर मधील विजेचे उत्पादन वाढणार आहे. या भागात थंडीच्या काळामध्ये विजेचा तुटवडा निर्माण होतो. मात्र आता संपूर्ण पाणी भारत वापरणार असल्याने या ठिकाणी विजेचा तुटवडा निर्माण होणार नाही.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत? चेन्नईतून कोलंबोत अलर्ट; फ्लाईटला सुरक्षा दलांचा वेढा

चिनाब नदीचे पाणी अडवल्याचा परिणाम थेट पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध भागात होणार आहे. शेतीस पाणी न मिळाल्यास या भागात अन्न-धान्य मिळण्यास अडचण होऊ शकते. तसेच भारताने झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे दरवाजे बंद केले तर, पाकिस्तानची स्थिती अजून गंभीर होऊ शकते. शेती, वीज निर्मिती आणि अन्य गोष्टींवर याचा परिणाम पाकिस्तानला सहन करावा लागू शकतो.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत?

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान पहालगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत पळून गेल्याचे म्हटले जात आहे. कारण, श्रीलंका एअरलाइन्सची फ्लाईट कोलंबो एअरपोर्टवर लँड होताच सुरक्षा दलांनी विमानाला वेढा घातला. तसेच सुरक्षा दलांनी विमानाच्या आत जाऊन देखील सर्च ऑपरेशन राबवले.

Web Title: Indian government water strike against pakistan baglihar dam closed chinab river after pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Indus Water Treaty:
  • jammu kashmir
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
1

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
2

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
3

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
4

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.