पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत? (फोटो -istockphoto)
कोलंबो: पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान पहालगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत पळून गेल्याचे म्हटले जात आहे. कारण, श्रीलंका एअरलाइन्सची फ्लाईट कोलंबो एअरपोर्टवर लँड होताच सुरक्षा दलांनी विमानाला वेढा घातला. तसेच सुरक्षा दलांनी विमानाच्या आत जाऊन देखील सर्च ऑपरेशन राबवले.
चेन्नई एरिया कंट्रोलमधून कोलंबो एअरपोर्टला माहिती पुरवण्यात आली. यामध्ये पहलगाम हल्ल्यातील 6 दहशतवादी चेन्नईतून कोलंबोला चाललेल्या श्रीलंकन एअरलाइन्समध्ये असल्याचे इनपुट मिळाले. ही माहिती मिळताच कोलंबो एअरपोर्टवर श्रीलंकन सुरक्षा दलांनी विमानाला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन राबवले.
चेन्नईतून कोलंबोला दिला गेला अलर्ट
श्रीलंका प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात चेन्नई एरिया कंट्रोलकडून अलर्ट मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर लगेच सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. अलर्टमध्ये पहालगाम हल्ल्यातील 6 दहशतवादी जात असल्याचा संशय होता. त्यानंतर विमानाची कडक तपासणी करण्यात आली. त्यानंतर फ्लाईटला क्लिअरन्स देण्यात आला.
Pahalgam Terror Attack: भारताची पाकिस्तानवर मोठी स्ट्राईक; थेट ‘या’ गोष्टीवर केला प्रहार
भारताची पाकिस्तानवर मोठी स्ट्राईक
भारताने आता पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व प्रकारचा व्यापार बंद केला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट व्यापाऱ्यावर बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.
भारताने राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे या सुचनेत म्हटले आहे. भारताने पहालगाम हल्ल्याचा बदल घेण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. या हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. एनआयएच्या तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत.
पाकिस्तान खबरदार! राफेल, मिराजचा आक्रमक युद्धाभ्यास
इंडियन एअर फोर्सने उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेस वे वर फ्लाईपास्ट केले. शाहजहापुरच्या साडे तीन किमीच्या मार्गावर लढाऊन विमानांनी टेक ऑफ आणि लॅंडींगचा सराव केला आहे. भारतीय वायुसेनेचे राफेल, मिराज आणि जग्वार या लढाऊ विमानांनी अवकाशात सराव केला. हा सराव पाहून अनेकांना युद्ध सुरू झाले की काय असे वाटत होते.
गंगा एक्सप्रेस वे च्या हवाई पट्टीवर राफेल, मिराज आणि जग्वार या लढाऊ विमानांसह ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने देखील लॅंडींग आणि टेक ऑफचा सराव केला. युद्धाच्या वेळेस इमर्जन्सी असल्यास मदत व्हावी म्हणून या एक्सप्रेस वे च्या हवाई पट्टीवर हा सराव करण्यात आला. उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेस वे हा देशातील असा पहिला हायवे आहे की, ज्यावर लढाऊ विमानांना टेक ऑफ आणि लॅंडींग करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.