भारतीय नौदलाचा पाकिस्तानी किनारपट्टीवर हल्ला, INS विक्रांतवरून लाहोर, कराची, रावळपिंडी, बहालवरपूरपर्यंत घुसला
Indian Navy Attack on Pakistan in marathi : पाकिस्तानला पुन्हा एकदा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि जैसलमेरसह अनेक भारतीय शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला, परंतु भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण यंत्रणेने ८ पाकिस्तानी क्षेपणास्त्रे पाडली. तसेच, पाकिस्तानचे २ जेएफ-१७ आणि एक एफ-१६ लढाऊ विमानही पाडण्यात आले.
पाकिस्तानी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूतील आरएस पुरा भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला होता, येथे सतत सायरन वाजत आहेत. सध्या जम्मू शहरात मोबाईल नेटवर्कही काम करत नाहीत. सतवारी कॅम्पवर हल्ला झाल्याची बातमी आहे. दुसरीकडे, कुपवाडामध्येही जोरदार गोळीबार झाला आहे. तंगधारमध्येही मोठ्या प्रमाणात तोफगोळ्यांचा मारा झाला आहे. त्याच वेळी, पूंछ आणि राजौरीमध्येही जोरदार गोळीबार सुरू आहे.
भारतीय हवाई संरक्षण दलाने अनेक महत्त्वाच्या ठिकाणांजवळ जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली (हाय-एंड एसएएम युनिट्स) तैनात केली आहे आणि पाकिस्तानी हल्ल्यांना सतत प्रत्युत्तर देत आहेत. ही प्रणाली जम्मू विमानतळाजवळ, पठाणकोटजवळ, अखनूर सेक्टर आणि सांबा परिसरात तैनात करण्यात आली आहे. जम्मू विमानतळावरून लढाऊ विमानांनी उड्डाण केले आहे.
याचदरम्यान आता भारतीय हवाई दलानंतर आता नौदलही सक्रिय झाले आहे. अरबी समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस विक्रांतने कराचीला लक्ष्य करून कहर करायला सुरुवात केली आहे. नौदलाच्या हल्ल्यामुळे कराची बंदरासह शहरात मोठी आग लागली आहे.
संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या कराची आणि ओरमारा बंदरांवर आयएनएस विक्रांतमधून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही बंदरांवर मोठी आग लागली. या हल्ल्यामुळे दोन्ही बंदर शहरांमध्ये धुराचे लोट पसरले आहेत. लोक घाबरून किनारी भाग सोडून आत पळत आहेत.
अहवालानुसार, पाकिस्तानी नौदलाचे कराची आणि ओरमारा येथे तळ आहेत. जिथे त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांचे मुख्यालय, युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात आहेत. या दोन नौदल तळांना उद्ध्वस्त करून, आयएनएस विक्रांतने पाकिस्तानी नौदलाला मोठ्या प्रमाणात हादरवून टाकण्यात यश मिळवले आहे. सध्या भारतीय नौदलाचे ऑपरेशन सुरू आहे.