फोटो सौजन्य: iStock
पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यात ऑपरेशन अंतर्गत भारताने दहशतवाद्यांची 9 तळ उध्वस्त केली आहेत. यानंतर आता पाकिस्तान सुद्धा भारतातील सीमा लगतच्या ठिकाणावर हल्ला करत आहे. पाकिस्तानकडून जम्मू एअरबेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र,भारताने थेट पाकचे F- 16 जेट पाडले आहे.
भारतीय लष्कराने पाकिस्तानचे एक F- 16 लढाऊ जेट पाडले आहे. सीमेवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांना लष्कराच्या एयर डिफेन्स तुकड्यांनीही प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी पाकिस्तानने जम्मूमधील एका हवाई तळावर रॉकेट डागले होते. मात्र भारतीय सेनेच्या सतर्कतेमुळे शत्रू सफल नाही झाले.
भारतीय लष्कराच्या आधुनिक S-400 मिसाइल डिफेंस सिस्टमने तातडीने कारवाई करत पाकिस्तानने डागलेल्या 8 क्षेपणास्त्रांना हवेतच उद्ध्वस्त केले आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्रांचे लक्ष्य जम्मू एअरस्ट्रीप होती, परंतु वेळीच प्रत्युत्तर दिल्याने मोठे नुकसान टळले.
भारतीय लष्कराने जम्मू विद्यापीठाजवळ दोन ड्रोन पाडल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर आता श्रीनगर विमानतळावर देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थान सारख्या सीमेलगतच्या बहुतांश भागांमध्ये ब्लॅकआऊट पाळले जात आहे.