Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IndiGo Flight Accident: मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान

IndiGo Flight Accident: नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगोच्या 6E 225 या विमानाला श्रीनगर विमानतळावर पार्किंग करताना अपघात झाला. सकाळी सुमारे 9.02 वाजता विमान VDGS पोलला धडकल्याने विमानाच्या पुढील भागाचे तसेच पोलचे नुकसान झाले. घटनेच्या वेळी विमानात प्रवासी आणि क्रू सदस्य उपस्थित होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 04, 2026 | 12:12 PM
मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान

मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान

Follow Us
Follow Us:
  • मोठा अनर्थ टळला!
  • प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट
  • पुढील भागाचे नुकसान
IndiGo Flight Accident: नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला शुक्रवारी सकाळी श्रीनगर विमानतळावर पार्किंग करताना अपघात झाला. विमान पार्किंगच्या ठिकाणी नेत असताना ते VDGS पोलला धडकले. या घटनेत विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले. मात्र, विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोची फ्लाइट 6E 225 (VT-NOG) नवी मुंबईहून सकाळी 6.50 वाजता श्रीनगरसाठी रवाना झाली होती. श्रीनगर विमानतळावर लँडिंग केल्यानंतर विमान पार्किंगच्या दिशेने नेण्यात येत होते. सकाळी सुमारे 9.02 वाजता विमान VDGS (Visual Docking Guidance System) पोलला धडकले.

Madras High Court News: पत्नी म्हणजे व्होडाफोनचा ‘पग’ कुत्रा नाही; मद्रास उच्च न्यायालयाने पतीला खडसावले

घटना घडली तेव्हा विमानात प्रवाशांसह क्रू सदस्यही उपस्थित होते. धडकेनंतर प्रवाशांना सीढ्यांच्या मदतीने सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला किंवा क्रू सदस्याला दुखापत झालेली नसल्याचे सांगण्यात आले.

विमानाच्या पुढील भागाचे नुकसान

पोलला झालेली धडक विमानाच्या पुढील भागाला बसली. त्यामुळे विमानाचे नुकसान झाले असून संबंधित पोलही क्षतिग्रस्त झाला. घटनेनंतर खबरदारी म्हणून इंडिगोने हे विमान पुढील उड्डाणासाठी न वापरता आयसोलेट केले आहे.

श्रीनगर एयरपोर्ट पर मुंबई से श्रीनगर जा रही इंडिगो की उड़ान पार्किंग के दौरान एक खंभे से टकरा गई। यह घटना सुबह करीब 9:02 बजे बे नंबर 06 पर हुई। विमान में सवार सभी यात्री और चालक दल के सदस्य सुरक्षित हैं और किसी के घायल होने की खबर नहीं है। यात्रियों को सीढ़ियों की मदद से विमान से pic.twitter.com/CY0qWHjicx — Vijay Sinha (@VijaySi67156108) September 4, 2026

विमान पार्किंग करताना ही धडक नेमकी कशामुळे झाली, याची तपासणी विमानतळ प्रशासनाकडून केली जात आहे. VDGS यंत्रणा विमानाला निर्धारित पार्किंग स्थळी अचूकपणे उभे करण्यासाठी मार्गदर्शन करते. त्यामुळे या घटनेमागे तांत्रिक कारण होते की अन्य काही कारण, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

मोठा अनर्थ टळला

विमानात प्रवासी असतानाच ही घटना घडल्याने काही काळ चिंता निर्माण झाली. मात्र, सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. विमानाचे झालेले नुकसान तपासल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

Web Title: Indigo flight from navi mumbai hits vdgs pole while parking at srinagar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • airport
  • IndiGo
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?
1

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात
2

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई
3

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
4

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.