H.D. Revanna : प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणाने मोठे वळण घेतले आहे. अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना हा सेक्स स्कँडल प्रकरणात देश सोडून फरार झाला आहे.
दोन्ही आरोपी नेत्यांचा जामीन अर्ज फेटाळला
रेवण्णाचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक प्रज्वल एचडी देवेगौडा यांच्या बंगळुरू येथील घरी पोहोचले होते. यानंतर एचडी रेवन्ना यांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपी नेत्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रज्वल यांनी अटकपूर्व जामिनासाठी आणि एचडी रेवन्ना यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती.
एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना
भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना आणि त्यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. प्रज्वलचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल झाले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल देशाबाहेर पळून गेला आहे. तो जर्मनीत असल्याचं बोललं जात आहे.