Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Protest: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; रांचीत बॅरिकेडिंग तोडून विधानसभा दिशेने आगेकूच, ७५० मीटर परिसरात जमावबंदी

Jharkhand Protest: झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (10 ऑगस्ट 2024) विधानसभा मोर्चाचे आवाहन केले आहे. गेल्या १६ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रांचीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 10, 2026 | 12:26 PM
विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; रांचीत बॅरिकेडिंग तोडून विधानसभा दिशेने आगेकूच, ७५० मीटर परिसरात जमावबंदी

विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; रांचीत बॅरिकेडिंग तोडून विधानसभा दिशेने आगेकूच, ७५० मीटर परिसरात जमावबंदी

Follow Us
Follow Us:
  • रांचीत विद्यार्थ्यांचा विधानसभा घेराव सुरू
  • बॅरिकेडिंग हटवत विद्यार्थ्यांचा पुढे कूच
  • विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा
Jharkhand Protest: झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या १६ दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाची पुढची दिशा म्हणून विद्यार्थ्यांनी सोमवारी (10) रांची येथील विधानसभा भवनाकडे मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे रांचीमध्ये प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

विधानसभा परिसरात कडेकोट सुरक्षा

विद्यार्थ्यांच्या प्रस्तावित विधानसभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना अलर्ट करण्यात आले आहे. विधानसभा परिसराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आली असून मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. एडीजी मुख्यालय मनोज कौशिक यांनी विद्यार्थ्यांना शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ विद्यार्थी ज्या पद्धतीने शांततापूर्ण आंदोलन करत आहेत, त्याच पद्धतीने पुढेही आंदोलन करावे, असे त्यांनी सांगितले.

Jharkhand JPSC : परीक्षेच्या वादात मोठी खळबळ; JPSC च्या तीन सदस्यांचा राजीनामा

आंदोलकांमध्ये समाजकंटकांचा शिरकाव होऊ नये

मोर्चामध्ये समाजकंटक किंवा उपद्रवी व्यक्ती सहभागी होणार नाहीत, याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान हिंसक किंवा आक्रमक परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना वारंवार शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. रांचीचे एसएसपी राकेश रंजन यांनीही कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे सांगितले. आंदोलनादरम्यान कायदा हातात घेतल्यास विद्यार्थ्यांच्या भवित्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा भवनाच्या ७५० मीटर परिसरात निषेधाज्ञा

विद्यार्थ्यांचा मोर्चा लक्षात घेता विधानसभा भवनाच्या ७५० मीटर परिसरात निषेधाज्ञा लागू करण्यात आली आहे. ही निषेधाज्ञा ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत लागू राहणार असून, दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत तिची अंमलबजावणी केली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जमशेदपूरमध्येही रविवार मध्यरात्रीपासून निषेधाज्ञा लागू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

भाजपकडून सरकारवर गंभीर आरोप

दरम्यान, भाजप नेते आणि पक्षाचे प्रदेश महासचिव अमर कुमार बाउरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू यांना ‘हाऊस अरेस्ट’ करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याचा दावा बाउरी यांनी केला. मात्र, या आरोपाची पोलीस किंवा प्रशासनाकडून स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

विद्यार्थ्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. झारखंडच्या विविध जिल्ह्यांतून रांचीला विधानसभा मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अडवले जात असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. आंदोलनादरम्यान सहा विद्यार्थी उपोषणावर बसल्याचीही माहिती समोर आली आहे. आता सोमवारी होणाऱ्या विधानसभा मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, विद्यार्थ्यांचा मोर्चा शांततेत पार पडतो की प्रशासन आणि आंदोलकांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पहिल्यांदाच व्यक्त केली भूमिका, म्हणाले ‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’

Web Title: Jharkhand students assembly march ranchi security prohibitory orders 750 metre zone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • Jharkhand
  • Ranchi
  • Student

संबंधित बातम्या

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना
1

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
3

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला
4

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.