केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा AIIMS मध्ये दाखल; कोरोनरी अँजिओग्राफीसह विविध तपासण्या
AIIMSमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी नड्डा यांच्यावर विविध वैद्यकीय तपासण्या केल्या. यामध्ये कोरोनरी अँजिओग्राफीचाही समावेश असल्याचे रुग्णालयाच्या आरोग्य बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे. अँजिओग्राफीद्वारे हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत आहे का किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा आहे का, याची तपासणी केली जाते.
Breaking: स्वातंत्र्यदिनाआधी दिल्लीत खळबळ!; IGI विमानतळ आणि उच्च न्यायालयात बॉम्बच्या धमक्या
नड्डा यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे अस्वस्थता जाणवली, याबाबत अधिक वैद्यकीय माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या असून सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत AIIMSकडून पुढील वैद्यकीय अपडेट जारी होण्याची शक्यता आहे.
जे. पी. नड्डा हे भारत सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. संघटनेतही त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी भाजपचे अध्यक्षपदही भूषवले आहे. नितीन नबी यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी ते भाजपच्या नेतृत्वाची सूत्रे सांभाळत होते. एम्सच्या निवेदनानुसार, नड्डा यांनी गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अस्वस्थ असल्याची तक्रार केली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जेपी नड्डा यांनी १४ ऑगस्ट रोजी ‘फाळणीच्या भीषण स्मृती दिना’निमित्त सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर केला. ते म्हणाले की, हा दिवस आपल्याला फाळणीच्या काळात कठीण परिस्थितीतून गेलेल्या लाखो लोकांच्या वेदना आणि त्यागाची, तसेच अनेकांच्या प्राणहानीची आठवण करून देतो.
जेपी नड्डा हे राज्यसभेतील सभागृह नेते आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान ते केवळ सभागृहात उपस्थितच नव्हते, तर त्यांनी विरोधी पक्षाला सडेतोड उत्तरही दिले. अवघ्या दोन दिवसांपूर्वी, जेव्हा मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमित शाह यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा जेपी नड्डा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते सभागृहाची दिशाभूल करत आहेत आणि चर्चा टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
गृहमंत्री शाह यांच्या सभागृहातील सततच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त करत खर्गे म्हणाले, “ज्या व्यक्तीच्या नावाने प्रस्ताव मांडला आहे, त्यांना तो मांडायला सांगा. तुम्ही त्यांना बोलवा.” श्री. हरिवंश यांनी त्यांचे विधान फेटाळून लावले आणि सभागृह नेते श्री. नड्डा यांना बोलण्यास सांगितले. नड्डा म्हणाले, “ते सभागृहाची दिशाभूल करत आहेत. तुम्ही सभागृहातील चर्चेपासून पळ काढता.
आनंदाची बातमी ! लाडक्या बहिणींना राज्य सरकार देणार 50000 रुपये?



