Photo Credit- Social Media लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात भरती
बिहार: राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. रक्तातील साखर वाढल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना पाटण्यातील राबडी निवासस्थानी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला नेण्यात येणार होते. राबडी देवी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताच त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रीय जनता दल (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून बिघडलेली होती, मात्र आज ती आणखी खालावली. त्यांचा एक नवीन फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते बेडवर झोपलेले असून ऑक्सिजन मास्क घातलेले दिसत आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी पसरताच, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या १०, सर्कुलर रोड येथील सरकारी निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर मीडिया आणि लोकांची गर्दी झाली आहे.
लालू प्रसाद यादव गेल्या काही वर्षांत अनेक गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे गेले आहेत. २०२२ मध्ये त्यांना किडनीचा आजार असल्याचे निदान झाले होते. त्यांची केवळ २५% मूत्रपिंडे कार्यरत होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांच्या मुलीने, राहिनी आचार्य यांनी, त्यांना आपली एक किडनी दान केली. ५ डिसेंबर २०२२ रोजी सिंगापूरमध्ये त्यांचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले.
त्याच वर्षी, त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या घरी ते अपघाताने पडले, ज्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले. त्यानंतर, त्यांच्यावर पाटण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने, त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले.
लालू यादव यांना २०२१ मध्ये हृदयविकार असल्याचे निदान झाले होते. रांचीच्या बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यानंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना विशेष उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले. २०२३ मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. कदाचित हा पहिलाच प्रसंग असेल, जिथे लालू यादव घरगुती आणि राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढत आहेत. RJD च्या राजकारणात लालू यादव यांच्या नेतृत्वातील सत्ता १९९० ते २००५ या कालावधीत पाहायला मिळाली. मात्र, २०२० मध्ये RJD ची राजकीय दिशा पूर्णतः वेगळी आणि नव्या विचारसरणीसह समोर आली. त्या वेळी लालू यादव निवडणुकीच्या मैदानातून पूर्णतः बाहेर होते.
सामाजिक न्यायासाठी ओळखले जाणारे लालू यादव हे गोंधळाच्या (कन्फ्यूजन) राजकारणाचेही तज्ज्ञ खेळाडू मानले जातात. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या रणनीतीचे उत्तम उदाहरण दाखवले. त्या निवडणुकीत भाजपला मोठ्या विजयाची अपेक्षा होती, मात्र तेव्हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या पुनरावलोकनाची गरज असल्याचे वक्तव्य केले. लालू यादव यांनी त्याच वक्तव्याला एक प्रभावी प्रचारहत्यार बनवले “जर भाजप सत्तेत आली, तर आरक्षण संपुष्टात येईल.” असा प्रचाक कऱण्यात आला. याच रणनीतीमुळे लालू यादव यांनी २०१५ मध्ये भाजपला मोठा फटका दिला आणि स्वतःची राजकीय ताकद पुन्हा सिद्ध केली.