संसदेचे अधिवेशन उद्यापासून सुरू, पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार घेणार शपथ संसदेचे अधिवेशन उद्यापासून सुरू, पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार घेणार शपथ संसदेचे अधिवेशन उद्यापासून सुरू, पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार घेणार शपथ (फोटो सौजन्य-एएनआय)
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून (24 जून) सुरू होत आहे. लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होणार असून त्यात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे. यानंतर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार असून 27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सात वेळा खासदार भर्तृहरी महताब यांची संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे हंगामी अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) म्हणून नियुक्ती केल्यामुळे अधिवेशनादरम्यान लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह, अमित शहा आणि नितीन गडकरी शपथ घेणार आहेत. त्यानंतर मंत्री परिषदेचे इतर सदस्य खासदार म्हणून शपथ घेतील.
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये ५८ लोकसभेचे सदस्य आहेत. केंद्रीय मंत्रिपरिषदेचे 13 सदस्य राज्यसभेचे खासदार आहेत आणि एक मंत्री, रवनीत सिंग बिट्टू हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. लुधियानामधून त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनंतर राज्यनिहाय खासदारांना इंग्रजी अक्षरानुसार शपथ दिली जाईल. संसदेच्या या अधिवेशनात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास असणार नाही.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै रोजी, लोकसभेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी 20 जून रोजी सांगितले होते की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कटक, ओडिशा येथील भाजप खासदार भर्त्रीहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. अध्यक्षांनी सुरेश कोडीकुन्नील, थलिकोट्टई राजुतेवर बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांना अध्यक्ष निवडीपर्यंत प्रो टेम स्पीकरला मदत करण्यासाठी नियुक्त केले आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत भाजपला सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे, तर उपसभापतीपद एनडीएच्या मित्रपक्षांपैकी एकाला दिले जाऊ शकते. I.N.D.I.A. ब्लॉकने उपसभापती पदाची मागणी केली आहे, जे परंपरेने नेहमी विरोधकांकडे जाते. मात्र, 17 व्या लोकसभेत उपसभापती नव्हते. मात्र, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉक या दोन्ही पक्षांनी सभापती आणि उपसभापती पदासाठी उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.