Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! केंद्राकडे महाराष्ट्राची 1754 कोटींची थकबाकी; मनेरगाच्या प्रश्नावर राज्यसभेत सरकारची कबुली

नवीन ग्रामीण रोजगार योजना आणि मनरेगाच्या कार्यान्वयन, आर्थिक आणि अंमलबजावणीच्या बाबींसंदर्भात राज्यांनी अनेक सूचना आणि चिंता व्यक्त केल्या आहेत, ज्या मंत्रालयाने विचारात घेतल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 26, 2026 | 02:12 PM
'महाराष्ट्राला 3 वर्षांत 520 कोटींचा निधी'; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

'महाराष्ट्राला 3 वर्षांत 520 कोटींचा निधी'; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

Follow Us
Follow Us:

मुंबई : मनरेगा अंतर्गत मजुरी आणि साहित्यापोटी महाराष्ट्रावर केंद्र सरकारचे अजूनही १७५४.६० कोटींचे देणे आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. काँग्रेस खासदार मुकुल वासनिक यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली गेली.

राज्यसभेत ग्रामविकास मंत्र्यांना मुकुल वासनिक यांनी विशेषतः नवीन ग्रामीण रोजगार योजनेबाबत आणि मनरेगाच्या देय रकमेच्या विलंबाबत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना केंद्राने सांगितले की, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीची सर्व देय मजुरी आधीच अदा करण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम या कालावधीपूर्वीची आहे. ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान म्हणाले की, सरकार बैठका आणि पत्रव्यवहाराद्वारे राज्यांच्या सतत संपर्कात आहे.

भारताची सुवर्ण कामगिरी ! फायनलमध्ये पाकिस्तान चारिमुंड्या चित; टीम इंडियाने जिंकले FIH Youth Hockey5s आशियाई विजेतेपद

नवीन ग्रामीण रोजगार योजना आणि मनरेगाच्या कार्यान्वयन, आर्थिक आणि अंमलबजावणीच्या बाबींसंदर्भात राज्यांनी अनेक सूचना आणि चिंता व्यक्त केल्या आहेत, ज्या मंत्रालयाने विचारात घेतल्या आहेत. मनरेगा अंतर्गत मजुरी थेट लाभहस्तांतरणद्वारे केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट दिली जाते.

प्रलंबित रकमेचे प्रस्ताव सादर करा

राज्यांना साहित्य आणि प्रशासकीय बाबींसाठी प्रस्ताव सादर करणे सुरुवातीची शिल्लक, खर्चाचा वेग आणि थकबाकी विचारात घेऊन दरवर्षी दोन हप्त्यांमध्ये निधी वितरित करते. सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मागील आर्थिक वर्षांतील प्रलंबित देयतांसाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे, जेणेकरून छाननीनंतर पात्र देयके त्वरित वितरित केली जाऊ शकतील.

व्यवस्थापन माहिती प्रणालीनुसार, १९ जुलै २०२६ रोजीची एकूण प्रलंबित देयता १९,३१०.०७ कोटी आहे. ज्यामध्ये आणि साहित्य या दोन्हींचा समावेश आहे. मंत्र्यांनी स्पष्ट केले की, हा आकडा व्यवस्थापन माहिती प्रणालीवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे, परंतु अंतिम आकडेवारी अद्याप प्रलंबित आहे.

गावकऱ्यांना भांडवलदारांचे मजूर बनविणार

ग्रामीण मजुरांना बेरोजगार करणे हा केंद्र सरकारचा हेतू आहे. मनरेगा ही काँग्रेस सरकारच्या काळात सुरू केलेली एक खूप चांगली योजना होती, परंतु मोदी सरकारने ती पूर्णपणे रद्द केली आहे. आता सुरू करण्यात आलेल्या नवीन योजनेचा एकमेव उद्देश देशभरातील गावकऱ्यांना त्यांच्या भांडवलदार मित्रांचे मजूर बनवणे हा आहे.

– मुकुल वासनिक, काँग्रेस खासदार

Web Title: Maharashtra outstanding dues of 1754 crore from union government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • maharashtra
  • Union Government

संबंधित बातम्या

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या
1

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा
3

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
4

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.