Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा? सुप्रिया सुळेंनी स्पष्टचं सांगितलं

Supriya Sule Delimitation Bill: डिलिमिटेशनवर सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा केला आहे. अमित शाह आणि किरेन रिजिजू यांच्यासोबतच्या बैठकीत ५० टक्के जागा वाढविण्याचा प्रस्ताव होता, मात्र विधेयकात त्याचा उल्लेख नसल्याचे त्यांनी म्हटले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 15, 2026 | 02:30 PM
Supriya Sule Delimitation Bill, Lok Sabha Delimitation News

Supriya Sule Delimitation Bill, Lok Sabha Delimitation News

Follow Us
Follow Us:
  • पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा सादर करू शकते
  • दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा न मिळाल्याने हे विधेयक पारित पारित होऊ शकले नाही
  • नवे बिल आल्यानंतर त्यावर २४ तासात आम्ही भूमिका घेऊ
 

Lok Sabha Delimitation Bill News: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला (Delimitation bill) शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा दिला जाणार असल्याच्या चर्चा निराधार आहेत. आमच्याकडे तसा प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर चर्चा करून २४ तासांनंतर भूमिका मांडू.” असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांबाबत भाष्य केलं. (Maharashtra Politics)

आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा सादर करू शकते, अशी चर्चा आहे. मागील अधिवेशनात दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा न मिळाल्याने हे विधेयक पारित पारित होऊ शकले नाही.पण आता विरोधी पक्षांनाही विधेयकाच्या बाजूने वळवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न केला जात आहे.

Nitin Gadkari Interview: इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिन खराब होते? नितीन गडकरींचे विरोधकांना प्रत्युत्तर

यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्हाला अद्याप नवे विधेयक मिळालेले नाही, नवे बिल आल्यानंतर त्यावर २४ तासात आम्ही भूमिका घेऊ. त्यापूर्वी इंडिया आघाडीतील सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल. नवे विधेयक कसे असेल, फेररचेनची प्रक्रिया कशी असेल, याबाबत चर्चा केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने अद्याप या विधेयावर कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही.

मागील अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह, मंत्री किरेन रिजिजू यांनी मतदारसंघ पुर्नरचनेत सरसकट ५० टक्के जागा वाढवण्यात यावा, असा प्रस्ताव दिला होता. पण प्रत्यक्ष विधेयकात तसे कोणतेही बदल दिसले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “माझ्यासह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत अमित शाह आणि किरेन रिजिजू यांनी स्वतंत्र बैठक घेतली होती. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या प्रतिनिधींशीही स्वतंत्र चर्चा झाली होती.”

होय ! राम मंदिरातून झाली 3 कोटींची दानचोरी; गोविंददेव गिरी यांनी पहिल्यांदाच केले मान्य

या बैठकीत सरसकट ५० टक्के जागा वाढविण्याचा प्रस्ताव आणला जाईल, असे सांगण्यात आले होते. तसेच, अधिवेशनादरम्यान कामकाज काही काळ स्थगित करून आवश्यक बदल केले जातील, असेही सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात विधेयकात असे कोणतेही बदल केले गेले नाहीत, असेही सांगण्यात आले.

‘५० टक्के जागा वाढत असतील तर चर्चेस तयार’

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मतदारसंघ फेररचना ही काळाची गरज असल्यास त्यावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. पण जर देशभरात सरसकट ५० टक्के जागा वाढविण्याचा प्रस्ताव असेल, तर त्यावर सकारात्मक विचार करता येईल. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची फेररचना झाल्यास दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय होऊ शकतो, अशा पद्धतीला आमचा विरोध आहे. त्यामुळे लोकसंख्येवर आधारित फेररचनेऐवजी देशभरात समान प्रमाणात जागा वाढविण्याचा पर्याय अधिक व्यवहार्य ठरू शकतो.” असही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

 

Web Title: Maharashtra politics supriya sule on delimitation bill support rumors ncp sp stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • supriya sule

संबंधित बातम्या

Supriya Sule Emotional Post for Ajit Pawar: तू अचानक येशील अन् ..;सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट
1

Supriya Sule Emotional Post for Ajit Pawar: तू अचानक येशील अन् ..;सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट

सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने; वडेट्टीवारांच्या माफीनंतर वादावर पडदा?
2

सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने; वडेट्टीवारांच्या माफीनंतर वादावर पडदा?

सुप्रिया सुळेंबाबतचं ‘ते’ वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी घेतलं मागे; म्हणाले, ‘अनावधानाने उल्लेख झाला…’
3

सुप्रिया सुळेंबाबतचं ‘ते’ वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी घेतलं मागे; म्हणाले, ‘अनावधानाने उल्लेख झाला…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.