होय ! राम मंदिरातून झाली 3 कोटींची दानचोरी; गोविंददेव गिरी यांनी पहिल्यांदाच केले मान्य
अयोध्या : अयोध्या राम मंदिर देवस्थानच्या दानचोरी प्रकरणात, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांनी पहिल्यांदाच सुमारे ३ कोटी रुपयांचा चंदा चोरीला गेल्याचे मान्य केले आहे. आतापर्यंत ते चोरी झाल्याचे स्वीकारत होते. परंतु, स्पष्टपणे काहीही सांगणे टाळत होते. आता पोलिसांनी २ कोटींपेक्षा जास्त रोकड आणि दागिने जप्त करत कोट्यवधी रुपयांच्या स्थावर मालमत्तेची चौकशी सुरू केली. तेव्हा गिरी यांना इतक्या मोठ्या रकमेची चोरी मान्य करणे भाग पडले. मात्र, १४ कोटी रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची बातमी चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ट्रस्टच्या राजीनाम्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली की, या संपूर्ण प्रकरणात त्यांची काहीही चूक नाही आणि ते राजीनामा देणार नाही. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाईटवरून माजी सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टी डॉ. अनिल मिश्रा यांची नावे हटवण्यात आली आहेत. यापूर्वी या दोघांचे व्हीआयपी पास आयडी देखील ब्लॉक करण्यात आले होते. ट्रस्टचे हंगामी सरचिटणीस कृष्ण मोहन आणि ट्रस्टी महंत दिनेंद्र दास यांच्या नावाने नवीन व्हीआयपी पास आयडी जारी करण्यात आले आहेत.
गुजरातच्या अंबाजी मंदिरातही दानचोरी
गुजरातमधील शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही दानचोरीची घटना समोर आली आहे. रोख रक्कम चोरीला गेल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील व्यवस्थेत बदल केला आहे. व्हिडिओमधील दाव्यानुसार, आउटसोर्स कर्मचाऱ्याने मंदिरातून कथितरित्या एक लाख रुपये चोरले.
मंदिर प्रशासनाच्या नाच्या माहितीनुसार, ही घटना मे महिन्यात घडली. चिराग ठाकोर असे आरोपीचे नाव आहे. तो वॉशरुमच्या बहाण्याने मोजणीच्या खोलीबाहेर जात होता, तेव्हा त्याच्या खिशातून कॅशचा बंडल खाली पडला, ज्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर चौकशीत आणखी दोन कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असल्याचे समोर आले. मंदिर प्रशासनाने एफआयआर दाखल केल्यानंतर तिन्ही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.
टिन्नू पुन्हा रिमांडवर
आरोपी रामशंकर यादव ऊर्फ टिन्नू आणि सुभाष श्रीवास्तव यांना पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर करून पुन्हा ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळवली आहे. आतापर्यंत अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा आणि करुणेश पांडे यांना रिमांडवर घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
अमिताभ ठाकूर यांचा पहिला अर्ज
माजी आयजी आणि आझाद अधिकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिताभ ठाकूर यांनी राम मंदिराच्या सीईओपदासाठी अर्ज केला आहे. ठाकूर हे १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एएसपी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग गोरखपूर येथे झाली होती. त्यानंतर एसपी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग पिथोरागड येथे झाली. पुढे त्यांनी यूपीच्या अनेक जिल्ह्यांत सेवा बजावली. २३ मार्च २०२१ रोजी गृह मंत्रालयाने अमिताभ ठाकूर यांना सक्तीने सेवानिवृत्त केले होते.
Supreme Court Row : न्यायालयातील गोंधळाप्रकरणी प्रबल प्रतापसह दोघे अटकेत; गुन्हा दाखल






