Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Almatti Dam: “भविष्यात धरणग्रस्त होण्याची वेळ…”; आलमट्टी धरणाच्या ऊंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध वाढला

अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढवण्याचं कर्नाटक सरकारचं नियोजन केले होते.  धरणातील पाणीसाठा आणखीन वाढणार असून सिंचन आणि इतर क्षेत्रात वाढ होणार असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 19, 2025 | 03:50 PM
Almatti Dam: "भविष्यात धरणग्रस्त होण्याची वेळ..."; आलमट्टी धरणाच्या ऊंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध वाढला

Almatti Dam: "भविष्यात धरणग्रस्त होण्याची वेळ..."; आलमट्टी धरणाच्या ऊंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध वाढला

Follow Us
Close
Follow Us:
कुरुंदवाड:  कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे हालचाली सुरू केल्याने शिरोळ तालुक्यावर महापुराचे मोठे संकट उभे ठाकले आहे. जर ही उंची वाढण्यास केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली, तर दरवर्षी पावसाळ्यात शिरोळ तालुक्यातील गावांना महापुराचा सामना करावा लागेल. त्यामुळे भविष्यात धरणग्रस्त होण्याची वेळ आपल्या गावांवर येऊ नये, यासाठी वेळीच सावध होऊन आलमट्टीच्या उंचीवाढीला विरोध करणाऱ्या हरकती दाखल करा, असे आवाहन आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केले.
खिद्रापूर येथे आंदोलन अंकुशच्या वतीने सुरू असलेल्या हरकत अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या अभियानाद्वारे आलमट्टीच्या उंचीवाढीला विरोध दर्शवण्यासाठी नागरिकांनी केंद्र सरकारकडे हरकती पाठवाव्यात असे सांगण्यात येत आहे.
यावेळी पुढे बोलताना चुडमुंगे म्हणाले कर्नाटक सरकारने केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाकडे आलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्याची मागणी केली आहे. यासाठी जाहिरात काढावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

या महिना अखेरीस केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.या बैठकीपूर्वी हरकती दाखल करून  विरोध दर्शवणे गरजेचे आहे, तरी ग्रामस्थांनी रजिस्टर पोस्टद्वारे हरकती दाखल कराव्यात. यावेळी आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील,सरपंच सारिका कदम,अमित कदम, हैदर मोकाशी, रशीद मुल्ला, रामगोड पाटील, गणेश पाखरे, मियाखान मोकाशी, जहांगीर सनदी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अलमट्टी धरणाच्या ऊंचीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ अत्यंत महत्वाचा निर्णय

सांगली दोन जिल्ह्याच्या मुळावर उठलेल्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे .त्यामुळे या धरणाची उंची भविष्यात वाढणार नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना दिली.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात  महापूरची स्थिति निर्माण होते. त्याला कर्नाटक सरकार जबाबदार आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पुराचा फटका बसतो. सध्या या धरणाची ऊंची ५१९ मीटर इतकी आहे. मात्र आता कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सांगली-कोल्हापूरवर महापूरचे संकट वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.

“देवेंद्रजी तुमचे जोशी का माशी…”; मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेचा मुद्दा बनला होता. १२३ टीएमसी क्षमता असलेले अलमट्टी धरण हे कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला जबाबदार असल्याच्या तक्रारी साखरपट्ट्यातील शेतकऱ्यांनी केल्या होत्या. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र, कर्नाटक दोन्ही सरकारं आमने-सामने आले होते. अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढवण्याचं कर्नाटक सरकारचं नियोजन केले होते.  धरणातील पाणीसाठा आणखीन वाढणार असून सिंचन आणि इतर क्षेत्रात वाढ होणार असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे.

Web Title: Maharashtra shirol people oppose to karnataka government almatti dam height increase decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Flood situation
  • Karnataka
  • kolhapur
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
1

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
2

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
3

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान
4

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.