उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर टीका (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: राज्यात गेले काही दिवस मराठी भाषेच्या मुद्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्यात हिंदी भाषेवरून ठाकरे गट आणि राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे आज भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते.
मुंबईमध्ये केवळ मराठी भाषाच चालणार असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठणकावले आहे. या सर्वसाधारण सभेत बळतान उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी तुमचे जोशी का माशी घाटकोपरमध्ये बोलले होते. त्या घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करून दाखवा.
घाटकोपरमध्ये हिंदी आलेच पाहिजे. घाटकोपरची भाषा मराठी आहे. तिथे मराठी भाषा सक्तीची करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. आम्ही कुणाचा दुस्वास करत नाही. आमचे हिंदीशी वैर नाही. मग तुम्ही सक्ती का करत आहात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
नाशिकमधून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
नाशिकच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले, ” मी हिंदुत्व सोडलेले नाही. हिंदू समाज हिंदू म्हणउण मतदान करू शकतो हे बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. असे भुरसटलेले हिंदुत्व मला मान्य नाही. मी हिंदुत्व सोडलेले नाही. मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही.” उद्धव ठाकरे यांनी इव्हीएम, वक्फ वरुण देखील टीका केली आहे.
Uddhav Thackeray: “…. त्याच्याशी हिंदूंचा संबंध नाही”; नाशिकमधून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “वक्फ बिलाला आपण विरोध केला. त्याच्याशी हिंदूंचा काहीही संबंध नाही. भाजपने एकदा तरी त्यांचे हिंदुत्व काय आहे हे सांगावे. यांचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. ही केवळ समाजात भांडण लावून सत्ता कर आहेत. ही कोणाचेही नाहीत. वापर आणि फेका अशी यांची वृत्ती आहे. केवळ मतांसाठी हे सर्व सुरू आहे.
शिवसेनेने एक विक्रम केला. आता भाजप जे करत आहे ते नक्की काय आहे? भाजपने की आपण हिंदुत्व सोडले आहे? महाराष्ट्र हिंदुत्व जपणारा आहे. आम्ही जय श्रीराम म्हणतो. जय श्रीराम म्हणताना जय शिवराय देखील म्हटले पाहिजे. तुमची वेडीवाकडी संस्कृती आमच्यावर लादू देणार नाही.