Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mamata Banerjee on GST Rates: जीएसटीच्या दरांवरून राजकारण; ममता बॅनर्जींंचा केंद्रावर हल्लाबोल, म्हटले, ‘श्रेय फक्त एका…..’

नवीन जीएसटी दरांवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. नवीन जीएसटी दरांचे श्रेय केंद्र सरकारला घेता येणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 22, 2025 | 06:13 PM
ममता बॅनर्जींनी केंद्रावर हल्लाबोल (Photo Credit- X)

ममता बॅनर्जींनी केंद्रावर हल्लाबोल (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • जीएसटीच्या दरांवरून राजकारण
  • ममता बॅनर्जींनी केंद्रावर हल्लाबोल, म्हटले
  • ‘यामध्ये केंद्राची कोणतीही भूमिका नाही’
New GST Rates: आजपासून (२२ सप्टेंबर) जीएसटीच्या नवीन दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने जीएसटीचे नवीन दर लागू करण्याची घोषणा केली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशाला संबोधित करताना त्याचे फायदे सांगितले होते. मात्र, आता यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नवीन जीएसटी दरांचे श्रेय केंद्र सरकारला घेता येणार नाही, असा दावा ममता बॅनर्जींनी केला आहे. त्या कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या.

‘यामध्ये केंद्राची कोणतीही भूमिका नाही’

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “जीएसटीमध्ये केंद्र सरकारचा कोणताही वाटा नाही. विमानावरील जीएसटी हटवावा, अशी मागणी करणारे पत्र मी सर्वात आधी लिहिले होते. जीव वाचवणाऱ्या अनेक औषधांवर आणि छोट्या-छोट्या वस्तूंवरही जीएसटी होता. तुम्हाला हे माहीत असायला हवे की यासाठी केंद्र सरकारचा एकही पैसा खर्च झाला नाही. सर्व पैसा राज्य सरकारच्या खात्यातून गेला आहे, तरीही याचे श्रेय केवळ एकच व्यक्ती घेत आहे.”

JUST IN | “West Bengal government will suffer a loss of Rs 20,000 crore due to #GST rate cuts. No credit for the GST rate cut should be given to the Centre but the credit should be given to the states. We will soon come out with advertisement on the issue,” West Bengal Chief… pic.twitter.com/cOK0Skvp4b — The Hindu (@the_hindu) September 22, 2025

‘२०,००० कोटी रुपयांचे नुकसान’

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “१०० दिवसांचे काम बंद आहे, आवास योजना, रस्ते आणि पाणी योजनांसाठी मिळणारा पैसा बंद आहे. सर्व शिक्षा अभियानाचे पैसेही बंद झाले आहेत! यातच आम्हाला पुन्हा २०,००० कोटी रुपयांचे महसुली नुकसान होणार आहे. मी घर कसे चालवणार? तरीही, सामान्य जनतेला याचा लाभ मिळाल्याचा मला आनंद आहे. मात्र, यात दिल्ली सरकारचे किंवा कोणत्याही पक्षाचे श्रेय नाही. हा पैसा आमच्या जीएसटीमधून घेतला गेला आहे. आम्हाला एकच जीएसटी मिळतो, पण नाव स्वतःचे लिहून २०,००० कोटी रुपये आमच्या राज्यातून घेऊन जात आहेत. मी लवकरच जाहिरातीच्या माध्यमातून हे जनतेला सांगेन.”

‘सगळ्या माध्यमांवर नियंत्रण’

ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारवर माध्यमांवर नियंत्रण ठेवल्याचाही आरोप केला. त्या म्हणाल्या, “नॅशनल मीडियापासून ते सगळ्या माध्यमांवर ‘गोदी मीडिया’ चे नियंत्रण आहे. आता दूरदर्शन दूरदर्शन राहिलेला नाही, तो गोदी दर्शन झाला आहे. ऑल इंडिया रेडिओही गोदी रेडिओ बनला आहे. जे काही करायला सांगितले जाते, तेच २४ तास चालते. आम्हाला बोलण्यासाठी कोणतीही जागा उरलेली नाही.”

Web Title: Mamata banerjee gst rates attack on center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 06:12 PM

Topics:  

  • Central Governement
  • GST Rates
  • Mamata Banerjee
  • Nation News
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi : भारताचा सर्वात मोठा सांस्कृतिक विजय! नेदरलँड्सने PM मोदींना परत केला 1000 वर्षांनंतर चोळ साम्राज्याचा ‘हा’ अमूल्य ठेवा
1

PM Modi : भारताचा सर्वात मोठा सांस्कृतिक विजय! नेदरलँड्सने PM मोदींना परत केला 1000 वर्षांनंतर चोळ साम्राज्याचा ‘हा’ अमूल्य ठेवा

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन
2

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन

कमी किमतीचा EMI तुमच्यासाठी ठरु शकतो तोट्याचा, TV किंवा Phone खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या
3

कमी किमतीचा EMI तुमच्यासाठी ठरु शकतो तोट्याचा, TV किंवा Phone खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

PM Modi:आता भारत मागे हटणार नाही! मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्याने भारताला मिळणार ‘ग्रीन हायड्रोजन,सेमीकंडक्टर’ची ताकद
4

PM Modi:आता भारत मागे हटणार नाही! मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्याने भारताला मिळणार ‘ग्रीन हायड्रोजन,सेमीकंडक्टर’ची ताकद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.