(Photo - X)
नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीच्या रॅलीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. ‘बंगालमध्ये आमचा पराभव झालेला नाही, आम्हाला हरवण्यात आलं आहे. याचा बदला लोकशाही मार्गाने घेऊ,’ असा इशाराही त्यांनी दिला. (Mamata Banerjee INDIA Bloc Rally)
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि SIR प्रक्रियेच्या निषेधार्थ INDIA आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली आयोजित केली होती. या सभेला देशभरातील विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील SIR प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. या प्रक्रियेमुळे बंगालमधील एक कोटीपेक्षा जास्त मतदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्याचा दावा त्यांनी केला.
दिल्लीत मोठं शक्तिप्रदर्शन, 20 विरोधी पक्ष एकत्र, राहुल गांधी काय म्हणाले?
ममता बॅनर्जी यांच्या भाषणातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती त्यांची बालकवितेच्या चालीवरील टीका. ‘व्हॅनिश व्हॅनिश येस पापा, व्होट चोरी येस पापा, लोकशाही चोरी येस पापा,’ अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. याशिवाय शेतकऱ्यांचा सन्मान आणि मजुरांच्या घरांबाबतही त्यांनी भाजपवर आरोप केले. ‘बीजेपी पाहिजे का? नो पापा, ज्ञानेश कुमार हवेत का? नो पापा,’ असं म्हणत त्यांनी उपस्थितांना भाजपला सत्तेतून हटवण्याचं आवाहन केलं.
SIR प्रक्रियेवर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालमधील जनता या प्रक्रियेची बळी ठरली आहे. आम्ही शरणागती पत्करणार नाही. प्राण गेला तरी चालेल, पण लोकशाहीसाठी लढा सुरूच ठेवू, बंगालमध्ये आमचा पराभव झालेला नाही, आम्हाला हरवण्यात आलं आम्ही याचा बदला घेऊ, आम्ही हा लढा लोकशाही मार्गाने घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या सभेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही भाजपवर टीका केली. २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष पुन्हा सत्तेत येणार नाहीत, असं विधान त्यांनी केलं.
एकीकडे ममता बॅनर्जींची आक्रमक टीका, तर दुसरीकडे अखिलेश यादवांचा २०२७ चा इशारा, यामुळे INDIA आघाडीच्या या रॅलीतील भाषणांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Ans: ममता बॅनर्जी यांनी 'Johnny Johnny Yes Papa' या प्रसिद्ध बालकवितेचा आधार घेत भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली.
Ans: SIR प्रक्रियेमुळे पश्चिम बंगालमधील एक कोटीपेक्षा जास्त मतदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्याचा दावा त्यांनी केला.
Ans: बंगालमध्ये आपला पराभव झाला नसून आपल्याला हरवण्यात आल्याचा दावा करत त्यांनी लोकशाही मार्गाने याचा बदला घेणार असल्याचं म्हटलं.






