Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 28, 2025 | 03:58 PM
मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

Follow Us
Close
Follow Us:

मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी नऊ आमदारांसह राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. जनतेच्या इच्छेनुसार ४४ आमदार सरकार स्थापन करण्यास तयार आहेत, असं राधेश्याम सिंह यांनी म्हटलं आहे.

अन्न उत्पादकांना अनुदान, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख…, मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

२ वर्षांपासून राष्ट्रपती राजवट

आम्ही राज्यपालांना सांगितले आहे. या समस्येवर काय उपाय असू शकतो यावरही आम्ही चर्चा केली. राज्यपालांनी आमचा मुद्दा लक्षात घेतला आहे आणि लोकांच्या हितासाठी कार्यवाही सुरू करतील. सरकार स्थापनेचा दावा करणार का? असं विचारलं असता ते म्हणाले की, भाजपचं केंद्रीय नेतृत्व या संदर्भात निर्णय घेईल. अध्यक्ष सत्यव्रत यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तपणे ४४ आमदारांची भेट घेतली आहे. नवीन सरकार स्थापनेला विरोध करणारा कोणीही नाही. लोकांना खूप त्रास होत आहे. गेल्या कार्यकाळात कोविडमुळे दोन वर्षे वाया गेली आणि या कार्यकाळात संघर्षामुळे आणखी दोन वर्षे वाया गेल्याचं त्यांनी सांगितलं.

सध्या विधानसभेतील संख्याबळ

मे २०२३ मध्ये, भाजप नेते एन. बिरेन सिंह यांनी मैतेई आणि कुकी-झो यांच्यातील वांशिक संघर्ष हाताळण्याच्या त्यांच्या सरकारच्या टीकेमुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. सध्या ६० सदस्यांच्या विधानसभेत ५९ आमदार आहेत, त्यापैकी एका आमदाराच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये ३२ मैतेई आमदार, तीन मणिपुरी मुस्लिम आमदार आणि नऊ नागा आमदार असे एकूण ४४ आमदार आहेत.

‘पर्यटन संघर्षमुक्त असावं अन् दहशतवाद…; पहलगाममध्येच बैठक घेत ओमर अब्दुल्लांनी दिला महत्त्वाचा संदेश

काँग्रेसचे पाच आमदार आहेत, सर्व मैतेई. याशिवाय, उर्वरित १० आमदार कुकी आहेत, त्यापैकी सात जणांनी भाजपच्या तिकिटावर गेल्या निवडणुकीत विजय मिळवला होता, दोन कुकी पीपल्स अलायन्सचे आहेत आणि एक अपक्ष आमदार आहे.

Web Title: Manipur bjp leaders meet governor claim 44 mla support to government form

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Manipur
  • Manipur News

संबंधित बातम्या

Tamil Nadu Election 2026 : तमिळनाडूसाठी भाजपची रणनीती; अण्णामलाईंना वगळून जाहीर केली २७ जागांसाठी उमेदवारांची यादी
1

Tamil Nadu Election 2026 : तमिळनाडूसाठी भाजपची रणनीती; अण्णामलाईंना वगळून जाहीर केली २७ जागांसाठी उमेदवारांची यादी

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा
2

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा

ADR India Report: निवडणूक रोखे रद्द झाले तरी भाजपच्या तिजोरीत कोट्यवधींचं घबाड; २०२४-२५ आर्थिक वर्षांचा आकडा पाहून बसेल धक्का
3

ADR India Report: निवडणूक रोखे रद्द झाले तरी भाजपच्या तिजोरीत कोट्यवधींचं घबाड; २०२४-२५ आर्थिक वर्षांचा आकडा पाहून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.