Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

अलीकडच्या काळात त्यांनी सोशल मीडियावर मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ 'भावी खासदार मल्हार सरकार' अशा पोस्ट शेअर करत शक्तिप्रदर्शन केले होते. या पोस्टमुळे पक्षातील वरिष्ठांनी नाराजीही व्यक्त केली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 11, 2026 | 11:33 AM
harashiv BJP Politics News, Rahul Kakade BJYM Dharashiv,

harashiv BJP Politics News, Rahul Kakade BJYM Dharashiv,

Follow Us
Follow Us:
  • धाराशिव भाजपमध्ये सुजितसिंह ठाकूर आणि राणा जगजीतसिंह पाटील गटांमधील संघर्ष
  • मल्हार पाटील यांच्या समर्थनातील सोशल मीडिया पोस्ट व नगरपालिका कारभारावरील टीका
  • गणेश इंगळगी यांच्या खांद्यावर BJYM च्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा
Dharashiv Politics: धाराशिवमधील भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजीचा नवे प्रकरण समोर आले आहे. धाराशिवच्या नगराध्यक्षांचे पती राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) जिल्हाध्यक्षपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे समर्थक गणेश इंगळगी यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे सोपवण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केवळ सहा महिन्यांपूर्वीच राहुल काकडेंची भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना पदावरून हटवण्यात आल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपातील ‘जुने विरुद्ध नवे’ या वादातून राहुल काकडे यांच्यावरील कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. राहुल काकडे हे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे विश्वासू मानले जातात.

Satara News : जिल्हा बँकेत जाण्याचा शिंदेंचा दरवाजा तूर्तास बंद? 48 पैकी 32 संचालक गेले सहलीवर

अलीकडच्या काळात त्यांनी सोशल मीडियावर मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ ‘भावी खासदार मल्हार सरकार’ अशा पोस्ट शेअर करत शक्तिप्रदर्शन केले होते. या पोस्टमुळे पक्षातील वरिष्ठांनी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, याबाबत पक्षाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. राहुल काकडे यांच्या पत्नी धाराशिवच्या नगराध्यक्ष आहेत. धाराशिव नगरपालिकेच्या कारभारावरून विरोधकांकडून आणि नागरिकांकडून टीका केली जात होती. या सर्व पार्श्वभूमीवर राहुल काकडे यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याचे मानले जात आहे.

काकडे म्हणाले, ‘वैयक्तिक कारणांमुळे पद सोडले’

जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर राहुल काकडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी वैयक्तिक कारणांमुळे हे पद सोडले असून, पक्षाचा निर्णय मला मान्य आहे,” असे त्यांनी सांगितले.

Gautam Adani US Court Bribery Case Dismissed: गौतम अदानींना अमेरिकन कोर्टाकडून मोठा

गणेश इंगळगी यांची नवी नियुक्ती

राहुल काकडे यांच्या जागी गणेश इंगळगी यांची भाजयुमो जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गणेश इंगळगी यांनी एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत. पण राहुल काकडे यांची तडकाफडकी करण्यात आलेली हकालपट्टी आणि त्यांच्या जागी करण्यात आलेली नियुक्ती यामुळे धाराशिव भाजपातील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे.

 

Web Title: Dharashiv bjp internal rift bjym president rahul kakade removed ganesh ingalgi appointed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Dharashiv News
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
2

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
3

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतींनाही ढकलले अडगळीत! हुतात्म्यांची नावे असलेला स्मृतिस्तंभ दुर्लक्षित
4

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतींनाही ढकलले अडगळीत! हुतात्म्यांची नावे असलेला स्मृतिस्तंभ दुर्लक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.