Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोजने सरस्वतीची हत्या केली, झाड कापण्याच्या यंत्राने तिचे तुकडे केले, अन् शेजाऱ्यांनी…

मुंबईत एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे झाड कापण्याच्या यंत्राने तुकडे केले. तीन-चार दिवस तो मृतदेहासोबत घरातच असल्याचा आरोप आहे. शेजाऱ्यांना त्याचा वास आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 08, 2023 | 08:50 AM
मनोजने सरस्वतीची हत्या केली, झाड कापण्याच्या यंत्राने तिचे तुकडे केले, अन् शेजाऱ्यांनी…
Follow Us
Follow Us:

मुंबईतील मीरा रोड येथील गीता आकाश इमारतीच्या जे विंगमधील फ्लॅट क्रमांक 704. रात्री 7 वाजता फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन सांगितले. पोलीस येतात, दार उघडले जाते. त्यानंतर आतील दृश्य मन हेलावून टाकणारे होते. एका महिलेची हत्या करून तिचे तुकडे करण्यात आले होते.

मनोज साहनी (वय 56) आणि सरस्वती वैद्य (वय 36) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. मनोजनेच सरस्वतीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचे तुकडे केल्याचा आरोप आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मनोजने हे कृत्य केल्याचा संशय आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी सरस्वतीची हत्या झाल्याचे समजते. आणि खून केल्यानंतर मनोज मृतदेहासोबत घरीच राहत होता. सध्या पोलिसांनी आरोपी मनोजला अटक केली आहे.

सरस्वतीच्या हत्येनंतर मनोजने ट्री कटर विकत घेतला. या कटरने त्याने मृतदेहाचे तुकडे केले. मात्र मनोजवर आणखी एक गंभीर आरोप लावण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, शरीराचे तुकडे केल्यानंतर मनोजने कुकरमध्ये काही भाग उकळले. पोलिसांनी फ्लॅटवर पोहोचून पॉलिथिनमध्ये भरलेल्या मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेतले.

पोलिसांनी काय माहिती दिली ?

हे जोडपे येथे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. साहनी यांनी महिलेच्या मृतदेहाचे तुकडे केले जेणेकरून ते शोधणे सोपे होईल. आम्ही साहनीला अटक केली असून हत्येमागील हेतू आणि तो कसा केला याचा तपास करत आहोत. असे पोलिसांनी सांगिलतले.

दुसऱ्या एका पोलिसाने सांगितले की, सरस्वतीच्या शरीराचे काही तुकडे गायब आहेत. मनोजनेच कोठेतरी फेकून दिल्याचा संशय आहे. या रिपोर्टनुसार, मनोज आणि सरस्वती कोणाशीही फारसे मिसळत नसल्याचंही शेजाऱ्यांचं म्हणणं आहे. मनोज साहनीविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Manoj kills saraswati dismembers her with a tree cutter and the neighbors nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2023 | 08:50 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Meera Road
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.