चंद्र सुर्यानंतर आता बदलत्या हवामानाचा अभ्यास करण्साठी आता इस्रो लवकरच एक मोहीम सुरू करणार आहे. हवामान अंदाज आणि आपत्ती चेतावणी देण्यासाठी इस्रोने एक उपग्रह विकसीत केला आहे. प्रगत तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेला उपग्रह पृथ्वीशिवाय समुद्राच्या पृष्ठभागावरही लक्ष ठेवणार आहे. हा INSAT-3DS ( meteorological satellite insat 3ds) उपग्रह असून लवकरच त्याच प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
[read_also content=”‘उत्पन्न नसलं तरी पत्नीला पोटगी देणं पतिसाठी बंधनकारक’ – अलाहाबाद उच्च न्यायालय https://www.navarashtra.com/india/allahabad-high-court-says-husband-duty-is-to-give-maintenance-to-his-wife-nrps-502384.html”]
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते लाँचिंग
इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, GSLV-F14 चं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रक्षेपण करणार आहे. ISRO आणि भारतीय हवामान विभाग यांच्या सहकार्याने INSAT-3DS मिशनची योजना आखण्यात आली आहे. हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES) साठी बेंगळुरू येथील UR राव उपग्रह केंद्रात विकसित करण्यात आला आहे. हवामान सेवा वाढविण्याच्या उद्देशाने हवामान वेधशाळा उपग्रहांच्या मालिकेचा एक भाग आहे. त्यात इनसॅट-3डी आणि इनसॅट-3डीआरसह आणखी 3 उपग्रहांचा समावेश आहे. तो आधीपासूनच स्वतःच्या वर्गात आहे. नवीन उपग्रह हवामानाचा अचूक अंदाज, सागरी वादळ आदींची माहिती योग्य वेळी देईल.
GSLV-F14/INSAT-3DS Mission: INSAT-3DS, ISRO’s latest meteorological satellite, developed at the U R Rao Satellite Centre in Bengaluru for the Ministry of Earth Science (MoES), has been flagged off to SDSC-SHAR, Sriharikota, for launch aboard GSLV-F14.https://t.co/47wpxKyxdp pic.twitter.com/nelmNjN8hu — ISRO (@isro) January 27, 2024






