Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आखाती तणावाचा भारतावर मोठा परिणाम? पेट्रोलपासून निर्यातीपर्यंत अर्थव्यवस्थेला बसू शकतो फटका

जवाहरलाल नेहरू बंदर सारख्या बंदरांवरील हालचालींवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ऊर्जा क्षेत्रावरही तणावाचा परिणाम होऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 17, 2026 | 03:16 PM
आखाती तणावाचा भारतावर मोठा परिणाम? पेट्रोलपासून निर्यातीपर्यंत अर्थव्यवस्थेला बसू शकतो फटका

आखाती तणावाचा भारतावर मोठा परिणाम? पेट्रोलपासून निर्यातीपर्यंत अर्थव्यवस्थेला बसू शकतो फटका

Follow Us
Close
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने भारतात वाढणार महागाई? तेल, व्यापार आणि रोजगारावर संकट
  • आखाती देशांतील तणावामुळे भारत सावध! पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि निर्यात अडचणीत येण्याची शक्यता
  • युद्धाचा भारतावर थेट परिणाम? आखाती तणावामुळे बंदरे, व्यापार आणि रोजगारावर दबाव
उरण: भारताचे आखाती देशांशी असलेले घनिष्ठ आर्थिक आणि व्यापारी संबंध लक्षात घेता त्या भागात निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यापार, तेल/वायू पुरवठा, रोजगार आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर या परिस्थितीचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Middle East War : इराणने ओलांडली ‘रेड लाईन’! या चुकीमुळे आखाती देश एकवटले; ट्रम्प यांना ट्रम्पला पाठिंबा, जगभरात खळबळ

भारताचा मोठा निर्यात-आयात व्यापार मध्यपूर्वेतील देशांशी जोडलेला आहे. विशेषतः युएई, सौदी अरेबीया, कतर, ओमान आणि कुवैत या देशांकडे भारतातून फळे, भाजीपाला, तांदूळ, मांस, कापड, औषधे आणि विविध औद्योगिक वस्तू मोठ्या प्रमाणावर निर्यात केल्या जातात. युद्धपरिस्थितीमुळे समुद्री मार्गामध्ये अडथळे निर्माण होणे, जहाज वाहतुकीचा खर्च वाढणे आणि विमा प्रीमियम वाढणे यामुळे निर्यात प्रक्रियेला फटका बसण्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

परिणामी काही ठिकाणी कंटेनर अडकून राहण्याच्या घटना घडल्या आहेत. याचा परिणाम भारतातील प्रमुख बंदरांवरही जाणवू शकतो, विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर सारख्या बंदरांवरील हालचालींवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम शेवटी सामान्य नागरिकांवर जाणवण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढणे, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू महाग होणे, वाहतूक खर्च वाढणे आणि महागाई वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, परिस्थितीवर लक्ष ठेवून भारत सरकार पर्यायी व्यापार मार्गाचा शोध, इतर देशांकडून तेल आयात वाढविणे, बंदर व्यवस्थापन मजबूत करणे आणि निर्यातदारांना मदत करणे यांसारख्या उपाययोजना करू शकते.

युद्धपरिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास निर्यात कमी

उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रावरही या परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतातील कृषी उत्पादने, समुद्री खाद्य, कापड उद्योग आणि औषध उद्योग यांचा मोठा बाजार मध्यपूर्वेत आहे. युद्धपरिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास निर्यात कमी होऊन उद्योगांवर आर्थिक दबाव निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मध्यपूर्वेतील पायाभूत आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ऊर्जा क्षेत्रावरही या तणावाचा परिणाम

ऊर्जा क्षेत्रावरही या तणावाचा परिणाम होऊ शकतो. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी मोठा हिस्सा मध्यपूर्वेकडून आयात करतो, विशेषतः इराक, सौदी अरेबीया, आणि युएई हे भारताचे प्रमुख तेल पुरवठादार आहेत. युद्धपरिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होऊ शकतो. इंधन दर वाढल्यास वाहतूक खर्च वाढती आणि त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते.

Middle East War : युद्ध थांबणार? ट्रम्प यांच्या शिलेदारानं इराणला झुकवलं? ‘त्या’ गुप्त मेसेजने जगभरात खळबळ

कामगारांच्या रोजगारावर परिणाम

रोजगाराच्या दृष्टीनेही ही परिस्थिती चिंतेची मानली जाते. आखाती देशांमध्ये सुमारे ८० ते ९० लाख भारतीय नागरिक विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. युद्धस्थिती तीव्र झाल्यास काही उद्योग आणि प्रकल्पांमध्ये मंदी येऊ शकते, त्यामुळे कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भारतात परतणाऱ्या कामगारांची संख्या वाढल्यास देशांतर्गत रोजगारावरही ताण निर्माण होऊ शकतो. तसेच परदेशात काम करणाऱ्या भारतीयांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन भारतात येते. मध्यपूर्वेतील रोजगार परिस्थिती बिघडल्यास ही आवक कमी होऊ शकते. याचा परिणाम अनेक कुटुंबांच्या आर्थिक स्थितीवर तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Middle east tensions may impact indias economy fuel prices exports and jobs could face pressure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

India-Iran ties: ‘इराण युद्ध जिंकेल आणि भारत…’ RAWच्या माजी प्रमुखांचा खळबळजनक दावा; दोन्ही देशांमधील संबंधांवर टाकला प्रकाश
1

India-Iran ties: ‘इराण युद्ध जिंकेल आणि भारत…’ RAWच्या माजी प्रमुखांचा खळबळजनक दावा; दोन्ही देशांमधील संबंधांवर टाकला प्रकाश

गुढीपाडव्यानिमित्त अंकिता वालावलकरने चाहत्यांना दिली गुड न्यूज; नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, ‘मोठं स्वप्न…’
2

गुढीपाडव्यानिमित्त अंकिता वालावलकरने चाहत्यांना दिली गुड न्यूज; नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, ‘मोठं स्वप्न…’

World War 3 : अधिक भयावह युद्धपरिणाम! इराणचा सौदीच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर भीषण हल्ला; इंधन दरवाढ पेटवणार महागाईची आग
3

World War 3 : अधिक भयावह युद्धपरिणाम! इराणचा सौदीच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर भीषण हल्ला; इंधन दरवाढ पेटवणार महागाईची आग

US Iran War : अमेरिकी अधिकारी आता इराणच्या निशाण्यावर? मंत्र्यांच्या  घरावर संशयास्पद ड्रोन हालचालीने खळबळ
4

US Iran War : अमेरिकी अधिकारी आता इराणच्या निशाण्यावर? मंत्र्यांच्या  घरावर संशयास्पद ड्रोन हालचालीने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.