Middle East War : इराणने ओलांडली 'रेड लाईन'! या चुकीमुळे आखाती देश एकवटले; ट्रम्प यांना ट्रम्पला पाठिंबा, जगभरात खळबळ (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
मिळालेल्या माहितीनुसार, आखाती देश आता ट्रम्प आणि अमेरिकेवर इराणिवरोधात कारवाईसाठी दबाव वाढवत आहे. आखाती देशांनी इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे मोडीत काढण्यास अमेरिकेला आवाहन केले आहे.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका(America)-इस्रायलने इराणविरोधात लष्करी कारवाई सुरु केली होती. या हल्ल्यांनतर इराणने आक्रमक पवित्रा घेत मध्यपूर्वेत इस्रायलसह संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया(Saudi Arabia), बहरीन, कुवेत, ओमान, इराक आणि कतार या देशांना लक्ष्य केले. या देशांतील अमेरिकन लष्करी तळे आणि दूतावासांवर हल्ले केले. इराणने दुबईमध्येही मोठा हल्ला केला होता. यामुळे आखाती देशांमध्ये प्रचंड अस्थिरता पसरली होती. या देशांनी इराणच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली.
सुरुवातील सर्व आखाती देशांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. प्रादेशिक युद्ध टाळण्यचा प्रयत्न केला. पण गेल्या तीन आठवड्यांपासून इराण आखाती देशांना सतत लक्ष्य करत आहे. या देशांच्या महत्त्वाच्या विमानतळ आणि बंदरांना लक्ष्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर गल्फ रिसर्च सेंटर चे अब्दुल अजीज सागर यांनी इराणने आखाती देशांचा उघड शत्रू बनला असल्याचे म्हटले आहे.
इराणने आखाती देशांच्या महत्त्वपूर्ण तेल प्रकल्पांवर हल्ले करुन शांततेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यामुळे या देशांनी इराणची हल्ले करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करण्याची विनंती अमेरिकेला केली आहे. याशिवाय प्रादेशिक सुरक्षा प्रस्थापित होणार नाही असे या देशांतील नेत्यांचे म्हणणे आहे. शिवाय स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केल्याने जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. ज्याचा थेट फटका आखाती देशांच्या अर्थव्यवस्था, पर्यटन आणि जागतिक प्रतिमेला बसत आहे.
तसेच अमेरिकेने कारवाई थांबल्यास भविष्यात इराण (Iran) पुन्हा लष्करी ताकदीने उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे आखाती देशांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे ट्रम्प प्रशासनाने इराणची लष्करी क्षमता मुळापासून उखडून टाकावी अशा आग्रह आखीत देशांनी धरला आहे.
Ans: इराणने मध्यपूर्वेतील सौदी अरेबिया, युएई यांसारख्या आखाती देशांच्या विमानतळांवर, बंदरांवर आणि तेल सुविधांवर मिसाइल व ड्रोन हल्ले केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेतली.
Ans: स्ट्रेट ऑफ होर्मुज हा मार्ग जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून इराणने या मार्गावर नाकेबंदी केली आहे. ज्यामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठा खंडित झाला आहे. ज्याचा परिणाम आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक बाजारावर झाला.
Ans: आखाती देशांनी अमेरिकेला इराणवरील कारवाई न थांबवण्याची विनंती केली आहे. ही कारवाई थांबल्यास त्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे या आखाती देशांनी अमेरिकेकडून इराणची सैन्य शक्ती पूर्णपणे नष्ट करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून भविष्यातील धोका टाळता येईल.






