Middle East War : युद्ध थांबणार? ट्रम्प यांच्या शिलेदारानं इराणला झुकवलं? 'त्या' गुप्त मेसेजने जगभरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या दोन्ही देशांनी एकमेकांवर आगपाखड केली आहे, परंतु पडद्यामागे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेचे विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात थेट संवाद झाल्याचा दावा केला जात आहे.
‘एक्सिओस’च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे विश्वासू दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी संवाद साधला आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर ही चर्चा थांबली होती. परंतु आता मात्र पुन्हा एकदा मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणशी संपर्क साधण्यात आला आहे. अराघची आणि विटकॉफ यांच्या काही संदेश पाठवण्यात आले आहे.
यामध्ये संघर्षावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती ही पहिलीच थेट सकारात्म चर्चा मानली जात आहे. याच वेळी ट्रम्प यांनी देखील दावा केला आहे की, इराणने आमच्याशी संपर्क साधला असून शांततेसाठी चर्चा करण्यास तयारी दाखवली आहे. आम्ही देखील चर्चेसाठी तयार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे इस्रायल(Israel) नेही आपल्या भूमिकेत बदलाचे संकेत दिले आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अजार यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, जर इराणने आपला आक्रमक पवित्रा बदलला, तर इस्रायल देखील शत्रुत्व संपवण्यास आणि हल्ले थांबवण्यास तयार आहे. या संकटावर राजनैतिक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे अजार यांनी म्हटले.
मात्र, इराण(Iran) च्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन दूतांशी कोणताही संपर्क साधल्याच्या दाव्यावर नकार दिला आहे. हल्ल्यापूर्वी चर्चा झाली होती, हे मान्य केले आहे. परंतु त्यानंतर कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा इराणने केला आहे. यामुळे सध्या मध्यपूर्वेतील शांततेबाबत अनिश्चितता उभी राहिली आहे.
My last contact with Mr. Witkoff was prior to his employer’s decision to kill diplomacy with another illegal military attack on Iran. Any claim to the contrary appears geared solely to mislead oil traders and the public. — Seyed Abbas Araghchi (@araghchi) March 16, 2026
Ans: गेल्या १८ दिवसांपासून मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध आता निवळण्याच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे.
Ans: ट्रम्प यांचे विश्वासू दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी संवाद साधला असून संघर्षावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
Ans: सध्या इराणने अमेरिकेशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाल्याचा दावा नकारला आहे. यामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष थांबणे अनिश्चितच आहे.






