Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMD Monsoon Update: आनंदाची बातमी! मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल, केरळमध्ये 26 मे, तर महाराष्ट्रात कधी?

मागील वर्षाप्रमाणे यंदाही मान्सूनने सुसाट वेग पकडत नियोजित वेळेआधी अंदमानात प्रवेश केला आहे. राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 16, 2026 | 02:40 PM
आनंदाची बातमी! मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल, केरळमध्ये 26 मे, तर महाराष्ट्रात कधी?

आनंदाची बातमी! मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल, केरळमध्ये 26 मे, तर महाराष्ट्रात कधी?

Follow Us
Follow Us:

IMD Monsoon Update News Marathi : भारतीय हवामान विभागाने (IMD) असा अंदाज वर्तवला आहे की, नैऋत्य मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे केरळमध्ये मान्सून १ जूनच्या सुमारास सुरू होतो, त्यानंतर तो देशाच्या उर्वरित भागाकडे उत्तरेच्या दिशेने सरकतो. येथूनच देशात मान्सूनच्या हंगामाची (जून ते सप्टेंबर) सुरुवात होते. गेल्या वर्षी मान्सून २४ मे रोजी सुरू झाला होता. याचदरम्यान आता आनंदाची बातमी समोर येते, गेल्या वर्षी 13 मे रोजी अंदमानात दाखल झालेला मान्सून यंदा 16 मे रोजी पोहोचला असून, हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार तो केरळमध्ये 26 मेपर्यंत आणि महाराष्ट्रात 2 ते 5 जूनदरम्यान दाखल होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.

चार दिवस आधी दाखल

आयएमडीनुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढील २४ तासांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये, अंदमान समुद्रात आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

Monsoon Rain Update: उकाड्यातून दिलासा! केरळात मान्सूनची एंट्री ठरली; IMD च्या अंदाजाने वाढली उत्सुकता

केरळमध्ये मान्सूनचे आगमन

तीव्र उष्णतेने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात दिलासादायक बातमी ही आहे की, नैऋत्य मान्सून यावर्षी देशात नेहमीच्या वेळेपेक्षा (१ जून) लवकर दाखल होत आहे. आयएमडीनुसार, अनुकूल हवामान प्रणालीमुळे मान्सून २६ मे २०२६ रोजी केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो. दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्रात ढगांचे आवरण दाटले आहे. मान्सून पुढील २४ तासांत अधिकृतपणे अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होईल.

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?

मान्सून याच गतीने सुरू राहिल्यास, तो ५ जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने असेही सूचित केले आहे की, एल निनोच्या प्रभावामुळे, यावर्षी देशात सामान्यपेक्षा किंचित कमी पाऊस (एलपीएच्या सुमारे ९२ टक्के) पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि मराठवाडा

स्कायमेटचे हवामानशास्त्रज्ञ महेश पलावत यांच्या मते, पाकिस्तान आणि वायव्य भारतातून येणारे अत्यंत उष्ण आणि कोरडे वारे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. परिणामी, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांत तापमान ४७ ते ४८ अंश सेल्सिअसच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचू शकते. जळगाव, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे तापमान आधीच ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. आता नागपूर, भंडारा, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर आणि धाराशिव येथे सर्वात तीव्र उष्णतेची लाट अनुभवायला मिळेल.

कोकण आणि मुंबई

मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये तापमान आणि आर्द्रता इतकी वाढली आहे की लोकांना प्रचंड घाम येत आहे. अधूनमधून आकाशात काळे ढग दाटून येत असून, त्यामुळे लोकांना पावसाची आशा वाटत आहे, परंतु सध्या तरी हवामान कोरडे आणि उष्ण राहील.

१० राज्यांमध्ये मेघगर्जनेचा इशारा

हवामान विभागाने देशभरातील १० राज्यांमध्ये मेघगर्जनेचा इशारा जारी केला आहे. वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. प्रशासनाने नागरिकांना वादळादरम्यान झाडांखाली, विजेच्या खांबांजवळ किंवा तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये उभे न राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच, उष्माघात टाळण्यासाठी, दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण घराबाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि सुती कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो.

Dhar Bhojshala Case : नमाजवर बंदी, तर हिंदूंना पुजेचा अधिकार; धार भोजशाळा प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय

Web Title: Monsoon arrives andaman early maharashtra rain update news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • india
  • maharashtra
  • Monsoon 2026

संबंधित बातम्या

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
1

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’
2

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’

Mumbai Goa Highway: कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! नऊ महिन्यांत ४० अपघात, १२ जणांचा मृत्यू
3

Mumbai Goa Highway: कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! नऊ महिन्यांत ४० अपघात, १२ जणांचा मृत्यू

Transport Employees Salary Hike: वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?
4

Transport Employees Salary Hike: वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.