Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MP Crime : अंत्यसंस्कारावरून भावांमध्ये भांडण, मोठ्या भावाने मागितला वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा हिस्सा

मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन भावांमध्ये वाद इतका वाढला की मोठ्या भावाने चक्क वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा भाग मागितला.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 03, 2025 | 09:49 PM
अंत्यसंस्कारावरून भावांमध्ये भांडण, मोठ्या भावाने मागितला वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा हिस्सा

अंत्यसंस्कारावरून भावांमध्ये भांडण, मोठ्या भावाने मागितला वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा हिस्सा

Follow Us
Follow Us:

मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन भावांमध्ये वाद इतका वाढला की मोठ्या भावाने चक्क वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा भाग मागितला. हा प्रकार जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या लिधोराताल गावात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८४ वर्षीय ध्यानी सिंह घोष हे बऱ्याच काळापासून आजारी होते आणि रविवारी त्यांचं निधन झालं. ते त्यांचा लहान मुलगा देशराजसोबत राहत होते. मोठा मुलगा किशनला वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच गावी पोहोचला. गावात पोहोचल्यावर, किशनने सांगितले की तो त्याच्या वडिलांचे अंतिम संस्कार करणार आहे, तर धाकटा मुलगा देशराजने दावा केला की त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यानेच त्यांचे अंतिम संस्कार करावेत. या प्रकरणावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.

जेव्हा गावकऱ्यांनी प्रकरण चिघळत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले. जटारा पोलिस स्टेशनचे प्रभारी अरविंद सिंह डांगी म्हणाले की, जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना किशन दारूच्या नशेत असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याने दोन्ही भाऊ अंतिम संस्कार करू शकतील यासाठी मृतदेहाचे अर्धे तुकडे करावे अशी वादग्रस्त मागणी केली.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि किशनला समजावण्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्नांनंतर, पोलिसांना त्याची समजूत काढण्यात यश आले आणि तो शांत झाला आणि तेथून निघून गेला. यानंतर, धाकटा मुलगा देशराजने वडिलांचे अंतिम संस्कार पूर्ण केले. ही घटना संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली. एक मुलगा आपल्या वडिलांच्या मृतदेहाचा हिस्सा मागूच कसा शकतो, याचं स्थानिकांना आश्चर्य वाटत आहे.

Web Title: Mp man demands half of fathers body dispute with brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • crime news
  • Madhya Pradesh crime
  • mp police

संबंधित बातम्या

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
1

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
2

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
3

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत
4

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.