Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharatpol Digital Platform: ‘भारतपोल’ प्लॅटफॉर्मने बदलला तपासाचा चेहरा; ७ वर्षांत ३६ देशांतून २७४ गुन्हेगारांना आणले भारतात!

इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०२२ मध्ये ४०, २०२३ मध्ये १००, २०२४ मध्ये १०७, २०२५ मध्ये ११२, तर २०२६ मध्ये आत्तापर्यंत १८० रेड कॉर्नर नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 06, 2026 | 11:58 AM
Amit Shah

Amit Shah

Follow Us
Follow Us:
  • आर्थिक घोटाळे करून देशाबाहेर पळालेल्यांची मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग मोकळा
  • दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या तपासाला गती व अतिरिक्त अधिकार.
  • आरोपी देशाबाहेर पसार असला तरी कोर्टात खटला चालवून शिक्षेची तरतूद
Bharatpol Digital Platform: केंद्र सरकारने २०१९ ते २०२६ या कालावधीत जगातील ३६ देशांतून २७४ फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्यात यश मिळाल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली फरार गुन्हेगारांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

सरकारच्या माहितीनुसार, २०१८ मध्ये लागू करण्यात आलेल्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यामुळे आर्थिक गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर २०१९ मधील एनआयए आणि यूएपीए सुधारणा कायद्यांसह २०२४ मध्ये लागू झालेल्या नव्या फौजदारी कायद्यांमुळे फरार आरोपींच्या अनुपस्थितीतही खटला चालविण्याची तरतूद करण्यात आली आहे. २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारतपोल या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सीबीआय, राज्य पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्रणांना एकाच नेटवर्कवर जोडण्यात आले आहे.

Supreme Court News: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सर्वोच्च

१७,८७४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०१९ ते २०२६ या कालावधीत मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) फरार गुन्हेगारांची सुमारे १७,८७४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. तसेच इंटरपोलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय समन्वय वाढविण्यासाठी सीबीआयने विशेष जागतिक कामकाज केंद्र स्थापन केले असून, सर्व राज्यामध्ये ‘इंटरपोल संपर्क अधिकारी’ नियुक्त करण्यात आले आहेत.

भारतीय डेटा सेंटर्सना मोठा दिलासा; परदेशी कंपन्यांसाठी अनुपालन प्रक्रिया होणार अधिक सोपी

‘ऑपरेशन त्रिशूल’ ठरले प्रभावी

इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०२२ मध्ये ४०, २०२३ मध्ये १००, २०२४ मध्ये १०७, २०२५ मध्ये ११२, तर २०२६ मध्ये आत्तापर्यंत १८० रेड कॉर्नर नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. तसेच ऑपरेशन त्रिशूल’द्वारे उपग्रह तंत्रज्ञान, डिजिटल फूटप्रिट्स आणि प्रोफाइल मॅपिंगच्या मदतीने फरार आरोपींचा माग काढण्याची मोहीम अधिक प्रभावी करण्यात आल्याचे सरकारने नमूद केले आहे.

२०२६ मध्ये १८० ‘रेड कॉर्नर’ नोटिसा जारी

गुन्हानिहाय आरोपींची संख्या:

हत्या / दरोडा / हिंसा: ६२

लैंगिक अत्याचार / बलात्कार / पॉक्सो (POCSO): ५३

संघटित गुन्हेगारी / गुंडगिरी / खंडणी: ४२

मानव तस्करी / अपहरण: १८

दहशतवादी कारवाया / अंमली पदार्थ: १७

फसवणूक / आर्थिक गुन्हा: ०९

Web Title: National news bharatpol digital platform cbi police extradition of 274 fugitives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Amit Shah
  • crime news
  • national news

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.