Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi In Lok Sabha: अमित शाहांनीच विद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश दिले ; राहुल गांधींचा थेट गंभीर आरोप, भाजप आक्रमक

Rahul Gandhi : देशातील पेपरलीक प्रकरण, सीजेपी विद्यार्थी आंदोलन, जंतर-मंतरवरील लाठीचार्ज आणि 'परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६' वरील चर्चेदरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत

  • By anuradha sagar
Updated On: Jul 29, 2026 | 04:18 PM
Rahul Gandhi, Amit Shah, Lok Sabha, Parliament Session

Rahul Gandhi, Amit Shah, Lok Sabha, Parliament Session

Follow Us
Follow Us:
  • ‘परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६’ वरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक
  • अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.
  • देशाच्या भविष्याने आपल्या रस्त्यांवर जे दाखवून दिले, त्याने माझा आत्मविश्वास वाढवला
 

Rahul Gandhi In Lok Sabha:  देशातील पेपरलीक प्रकरण, सीजेपी विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि राममंदिर दान चोरी यांसारख्या प्रकरणामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशन दणाणून गेले आहे. विरोधी इंडिया आघाडीने सत्ताधारी भाजप सरकार घेरण्याची एकही संधी सोडली नसल्याचे दिसत आहे. खास बाब म्हणजे जंतरमंतरवर विद्यार्थ्याच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज याच मुद्द्यावरून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर गंभीरआरोप केल्याचे पाहायला मिळाले.

पेपरफुटीशी संबंधित ‘परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६’ वरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत एक असे वक्तव्य केले, ज्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या खासदार चांगलेच भडकले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थ्याच्या संसद मार्चदरम्यान शेकडो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. अनेक ठिकाणी पॅलेटगन आणि गोळीबाराच्याही घटना उघडकीस आल्या. याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी थेट, “गृहमंत्री अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.” असा गंभीर आरोप केला आहे.

Priyanka Gandhi Loksabha: बलात्काऱ्यांचे समर्थन करणाऱ्याला शिक्षण मंत्री पद…; प्रियांका गांधींची जहरी टिका

राहुल गांधी म्हणाले की, “गृहमंत्री अमित शाह यांच्यात सभागृहात येऊन बसण्याचे धाडस नाही. मी त्यांना ३० गाड्यांच्या ताफ्यात थरथर कापत बसलेले पाहिले. गृहमंत्री आज इथे का नाहीत? अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.” राहुल गांधीच्या या आरोपांमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी भाजप खासदारांनी राहुल गांधींकडे माफी मागावी, अशी मागणी केली.

राहुल गांधी म्हणाले, “मी काही विद्यार्थ्यांशी बोललो मी त्यांना विचारले की विद्यार्थी असण्याचा अर्थ काय असतो. त्या मुलीने एक सुंदर उत्तर दिले. ती म्हणाली, ‘विद्यार्थी म्हणजे अशी व्यक्ती, जिचे मन आणि हृदय खुले असते. विद्यार्थ्यांना माहित असते की त्यांना अजून शिकायचे आहे आणि हे विश्व सतत बदलत असते. त्यामुळे, त्यांचा असा विश्वास असतो की ज्ञानही सतत बदलत असते.” असं उत्तर विद्यार्थ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

“एक विद्यार्थीनी म्हणाली, काही लोक विद्यार्थी नसतात; त्यांचा पूर्ण विश्वास असतो की त्यांना सर्व काही माहित आहे आणि ज्ञान आतून येते. ते स्वतःला देव मानतात. ते अहंकारी असतात आणि कोणाचेही ऐकत नाहीत. ते इतरांच्या सत्याचा आदर करत नाहीत.” असा टोलाही राहुल गांधींनी लगावला. यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. यानंतर राहुल गांधींचे हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचा सांगत माफी मागण्यास सांगितले.

भाजपच्या गदारोळात, राहुल गांधी म्हणाले की, “ते आता बोलणार नाहीत आणि खाली बसले, तेव्हा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांना तो शब्द न वापरण्याची आणि आपले भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली.”

Rahul Gandhi: संसदेत राहुल गांधींच्या ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ वक्तव्यावरून गदारोळ; वादग्रस्त शब्द लागले हटवावे

दरम्यान, जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाबाबत राहुल गांधी म्हणाले, “मी खूप उत्साहित झालो होतो. देशाच्या भविष्याने आपल्या रस्त्यांवर जे दाखवून दिले, त्याने माझा आत्मविश्वास वाढवला. हा राग नव्हता, हिंसा नव्हती, द्वेष नव्हता. ही या देशातील तरुणांची, या देशाच्या भावी पिढीची एक सखोल अभिव्यक्ती होती. भाजपमधील माझ्या मित्रांसहित सर्व राजकीय पक्षांनी या अभिव्यक्तीचा आदर केला पाहिजे.” असही राहुल गांधींनी नमुद केलं.

तसेच, भाजपमधील माझ्या मित्रांनी जर त्यांच्या मुलांना विचारले की, सीजेपीच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांनी जे केले त्याबद्दल त्यांना कसे वाटते, तर त्यांच्या मुलांमध्येही एकमत दिसून येईल. जे घडले त्यात काहीही चुकीचे नाही आणि प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे.” असंही राहुल गांधींनी सांगितलं.

 

 

Web Title: National news rahul gandhi lok sabha speech accuses amit shah student protest firing order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Amit Shah
  • lok sabha
  • Parliament session
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Amit Shah UCC Statement : अमित शाहांचा मोठा दावा! लवकरच लागू करणार समान नागरी कायदा
1

Amit Shah UCC Statement : अमित शाहांचा मोठा दावा! लवकरच लागू करणार समान नागरी कायदा

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा
2

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
3

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
4

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.