Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court On Live In Relationship: लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा छळ कायदा लागू! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

संबंधित तरुणाने आपल्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून तिच्याशी विवाह केला आणि नंतर तिचा हुड्यासाठी छळ, क्रूरता व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने असा युक्तिवाद केला की, कथित दुसरे लग्न कायदेशीररीत्या अमान्य होते, त्यामुळे कलम ४९८-अ अंतर्गत त्याला "पती' मानले जाऊ शकत नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 04, 2026 | 08:12 AM
Supreme Court On Live In Relationship :

Supreme Court On Live In Relationship :

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटकातील एका प्रकरणातून ही याचिका सर्वोच्च न्यायालयात पोहोचली होती.
  • पतीने आधीचे लग्न लपवून तिच्याशी विवाह केला, नंतर हुंड्यासाठी छळ, क्रूरता आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला
  • दुसरे लग्न कायदेशीररीत्या अमान्य असल्याने कायद्याच्या नजरेत मी ‘पती’ ठरत नाही, त्यामुळे ४९८-अ लागू होत नाही.”
 

Supreme Court On Live In Relationship: जोडीदार किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून होणारा छळ किंवा अत्याचार यांसारख्या प्रकरणांमध्ये, लिव्ह-इन जोडीदाराला पत्नीप्रमाणेच अधिकार असतील, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच एखादे लिव्ह-इन रिलेशनशिप हे लग्नाच्या स्वरूपाचे असेल आणि दोन्ही बाजूंचा लग्न करण्याचा उद्देश असेल तर भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ जे पती किंवा त्याच्च्या नातेवाईकांकडून केल्या जाणाऱ्या क्रूरतेशी संबंधित आहे ते आता लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडीदारांनाही लागू होईल, अस कोर्टाने सोमवारी म्हटले. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, कलम ४९८-अ अशा लिव्ह-इन संबंधांनाही लागू होऊ शकते जे वैवाहिक नात्यासारखे प्रस्थापित झाले आहेत.

पहिले लग्न लपविल्याचा आरोप

कर्नाटक हायकोटांने आरोपीविरोधात सुरू असलेली गुन्हेगारी कारवाई रद्द करण्यास नकार दिल्यानंतर हे प्रकरण है प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले. महिलेने आरोप केला की, संबंधित तरुणाने आपल्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून तिच्याशी विवाह केला आणि नंतर तिचा हुड्यासाठी छळ, क्रूरता व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने असा युक्तिवाद केला की, कथित दुसरे लग्न कायदेशीररीत्या अमान्य होते, त्यामुळे कलम ४९८-अ अंतर्गत त्याला “पती’ मानले जाऊ शकत नाही.

‘जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा’; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा

थेट अटक नको

सुप्रीम कोर्टने अटकेबाबत ‘अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य’ प्रकरणातील मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले आणि सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये प्राथमिक चौकशीशिवाय बेट अटक केली जाऊ नये, कोर्टाने आरोपीचे अपील फेटाळून लावत म्हटले की, या प्रकरणातील गुन्हेगारी कारवाई रद्द करण्यासाठी कोणताही आधार नाही.

कलम ४९८-अ म्हणजे?

‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, २००५’ हा लिव्ह-इन संबंधाना मान्यता देतो, परंतु त्यात मुख्यत्वे नागरी दिलासा देण्यावी तरतूद आहे. तर दुसरीकडे, कलम ४९८-अ है गुन्हेगारी दायित्व निश्चित करते.

है कलम पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून महिलेवर होणाऱ्या क्रूरतेविरोधात लावले जाते.
यामध्ये जास्तीत जास्त ३ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.

‘अल्पवयीन मुलीचा हात ओढणे म्हणजे…’, POCSO प्रकरणात उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

कलम ४९८-अ अंतर्गत ‘क्रूरता’ या व्याख्येत सामान्यतः अशा कृत्यांचा समावेश होतो, ज्यामुळे महिलेला गंभीर शारीरिक आणि मानसिक हानी पोहोचण्याची शक्यता असते किंवा हुंड्यासाठी तिचा छळ केला जातो.

१ जुलै २०२४ पासून ‘भारतीय दंड संहिता ऐवजी ‘भारतीय न्याय संहिता लागू झाली आहे. आयपीसीच्या कलम ४९८-अ सारखीच तरतूद आता बीएनएसच्या कलम ८५ मध्ये करण्यात आली आहे.

 

Web Title: National news supreme court rules ipc 498a dowry harassment law applies to live in partners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • Live In Relation
  • national news
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Justice Vikram Nath Next CJI: कोर्टाचे लाइव्ह-स्ट्रीमिंग सुरू करणारे पहिले न्यायाधीश! न्यायमूर्ती विक्रम नाथ होणार नवे CJI
1

Justice Vikram Nath Next CJI: कोर्टाचे लाइव्ह-स्ट्रीमिंग सुरू करणारे पहिले न्यायाधीश! न्यायमूर्ती विक्रम नाथ होणार नवे CJI

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
3

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल
4

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.