Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash : पतीसोबत नवं आयुष्य, विमान प्रवासाचं स्वप्न, एका क्षणात उद्ध्वस्त; अहमदाबाद विमान अपघातात नववधूचा मृत्यू

गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे झेपावणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 चा भीषण अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे. आतापर्यंत या अपघातात 204 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 12, 2025 | 09:12 PM
पतीसोबत नवं आयुष्य, विमान प्रवासाचं स्वप्न, एका क्षणात उद्ध्वस्त; अहमदाबाद विमान अपघातात नववधूचा मृत्यू

पतीसोबत नवं आयुष्य, विमान प्रवासाचं स्वप्न, एका क्षणात उद्ध्वस्त; अहमदाबाद विमान अपघातात नववधूचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे झेपावणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 चा भीषण अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे. आतापर्यंत या अपघातात 204 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली असून, यात राजस्थानमधील एक 21 वर्षीय नवविवाहिता ‘खुशबू’ हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुष्यातील पहिल्या विमानप्रवासाचं आणि विदेशात पतिला भेटण्याचं तिचं स्वप्न अधूरं राहिलं आहे.

Ahmedabad Plane Crash: चमत्कार म्हणावं की नशीब? विमान दुर्घटनेतून बचावला एकमेव प्रवासी, स्वतःच चालत आला अन्… VIDEO

राजस्थानच्या बाळोतरा जिल्ह्यातील अराबा गावातील रहिवासी खुशबू ही नुकतीच विवाहबद्ध झाली होती. तिचं लग्न यावर्षी 18 जानेवारीला जोधपूर जिल्ह्यातील लूणी खाराबेरा गावचे डॉक्टर विपुल यांच्याशी झालं होतं. विवाहानंतर काही महिने सासरी आणि माहेरी राहून ती अखेर लंडनला पतीकडे निघाली होती.

खुशबू वडील आणि चुलत भावासोबत अहमदाबाद विमानतळावर पोहोचली होती. एअर इंडिया फ्लाइट AI-171 मधून लंडनला जाण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र, टेकऑफनंतर विमान काही मिनिटांतच विमान कोसळलं, आणि त्या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भावूक निरोपाचा क्षण अन्…

खुशबूचे वडील मदनसिंह यांनी विमानतळावर मुलीला निरोप देताना एक फोटो काढला होता. तो फोटो त्यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर टाकला होता, ज्यावर लिहिलं होतं – “आशीर्वाद खुशबू बेटा, गोइंग टू लंडन.”मुलीला विमानात बसवून ते आणि चुलत भाऊ परत गावाकडे निघाले होते. पण वाटेतच अपघाताची बातमी समजताच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मदनसिंह यांचा गावात मिठाईचा व्यवसाय आणि थोडीफार आहे. खुशबू ही त्यांच्या चार मुलांपैकी सगळ्यात मोठी मुलगी होती. तिच्या मागे दोन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. लग्नानंतर काहीच महिन्यांनी लंडनला नवऱ्याकडे जाणाऱ्या मुलीचं अचानक असे जाणं संपूर्ण कुटुंबासाठी असह्य वेदना देणारं ठरलं आहे. लंडनला रवाना होण्याच्या वेळी खुशबू आईला बिलगून रडत होती, कुटुंबासाठी हा क्षण अत्यंत भावूक होता.

Ahemdabad Plane Crash : टेकऑफ की लँडिंग… कधी असतो विमान क्रॅश होण्याचा सर्वाधिक धोका? वाचा सविस्तर

ही बातमी समजताच अराबा गावात शोकसागर पसरला आहे. लग्न घरात तिच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली .खुशबूचं आयुष्याचं सर्वात गोड स्वप्न, पतीबरोबरचं नवं आयुष्य, विमानप्रवासाच्या त्या काही क्षणांतच उद्ध्वस्त झालं. तिचं पहिलं उड्डाण शेवटचं ठरलं आहे.

Web Title: Newlywed bride khushboo died in air india ahmedabad plane crash latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 09:12 PM

Topics:  

  • Ahemdabad
  • air india
  • Plane Accident

संबंधित बातम्या

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
1

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Baramati Plane Accident : बारामतीत विमानाचा अपघात; उड्डाणावेळी चाकात बिघाड झाला अन्…
2

Baramati Plane Accident : बारामतीत विमानाचा अपघात; उड्डाणावेळी चाकात बिघाड झाला अन्…

Surat Liquor Party News: सुनेच्या दारुपार्टीमुळे वैतागलेल्या सासऱ्याने फोनकरून दिली टीप; पोलिसांनी टाकली धाड आणि….
3

Surat Liquor Party News: सुनेच्या दारुपार्टीमुळे वैतागलेल्या सासऱ्याने फोनकरून दिली टीप; पोलिसांनी टाकली धाड आणि….

Pune Airport: ‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’ची आकडेवारी; पुण्यात ११ विमानांना पक्ष्याची धडक
4

Pune Airport: ‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’ची आकडेवारी; पुण्यात ११ विमानांना पक्ष्याची धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.