टेकऑफ की लँडिंग... विमान क्रॅश होण्याचा सर्वाधिक धोका कधी असतो? वाचा सविस्तर
अहमदाबादमध्ये आज मोठी दुर्घटना घडली. २४२ प्रवाशांना घेऊन लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं. गेल्या २ वर्षांत मोठ्या विमान दुर्घटना घडल्या आहेत. त्यानंतर विमान प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान जगभरातील विमान अपघातांच्या विश्लेषणानंतर फ्लाइट सेफ्टी फाउंडेशनने सादर केलेला अहवाल धक्कादायक आहे. अहवालानुसार, जगभरातील अशा अपघातांपैकी १४ टक्के अपघात टेकऑफ दरम्यान झाले आहेत. तर, ४९ टक्के विमान अपघात लँडिंग दरम्यान झाले आहेत. मात्र विमान अपघात होण्याचा धोका सर्वाधिक कधी असतो? टेकऑफ की लँडिंग दरम्यान, जाणून घेऊया…
टेकऑफ दरम्यान, अनेक प्रकारे विमान अपघाताचा धोका असतो. प्रथम, पक्षी धडकण्याचा धोका असतो. पक्षी इंजिनला धडकल्यास अपघात होऊ शकतो. या घटनेमुळे इंजिन बिघाड होऊ शकतो. यूएस एअरवेजच्या फ्लाइट १५४९ सोबत असाच प्रकार घडला होता. पक्ष्यांचा थवा विमानाला धडकला होता.
इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ दरम्यान विमान अपघात होऊ शकतो आणि मागे फिरणं कठीण होतं. टेकऑफ दरम्यान किंवा रनवेच्या निर्धारित लांबीनंतर टेकऑफ दरम्यान धावपट्टीवर विमान घसरल्याने देखील विमान अपघात होऊ शकतो. जरी फ्लॅप्स, स्लॅट्स, ब्रेक्स किंवा स्पीड सेटिंग्जमध्ये बिघाड असला तरी विमानाचे संतुलन बिघडू शकतं आणि या समस्येमुळे अपघात होऊ शकतो.
जर विमानाचा लोडिंग बॅलन्स योग्य नसेल किंवा जास्त वजन असेल तर विमानाला आवश्यक लिफ्ट मिळत नाही. अशा परिस्थितीतही अपघाताचा धोका असतो. खराब हवामान देखील टेक-ऑफ दरम्यान विमानासाठी धोका बनू शकते. याशिवाय, धावपट्टी बदलणे, चुकीचा वेग अंदाज किंवा संप्रेषणातील बिघाड हा देखील अपघात होण्यामागे मोठा धोका असू शकतो.
जगात घडणाऱ्या सर्व विमान अपघातांपैकी बहुतेक घटना लँडिंग दरम्यान घडतात. तपास अहवालाच्या आधारे, याची अनेक कारणे देण्यात आली आहेत. पहिले कारण म्हणजे हार्ड लँडिंग किंवा बाउन्स. जेव्हा विमान आवश्यकतेपेक्षा जास्त दाबाने जमिनीवर उतरते, तेव्हा लँडिंग गियर आणि इतर भाग तुटण्याचा धोका असतो. जर विमान धावपट्टीच्या निश्चित श्रेणीबाहेर गेल्यानंतर उतरले तर ओव्हररनची ही घटना देखील अपघाताचे कारण बनू शकते. अचानक दिशा बदलल्याने लिफ्ट कमी होते आणि विमान खाली पडू शकते.
Ahmedabad Plane Crash: बंगलोर ते अहमदाबाद…! ‘हे’ आहेत भारतातील भयानक विमान अपघात; यादी एकदा वाचाच…
धुके, पाऊस किंवा बर्फवृष्टीसारख्या कमी दृश्यमानतेच्या बाबतीत, धावपट्टी स्पष्ट दिसत नसली तरीही अपघाताचा धोका कायम राहतो. लँडिंग करणे कठीण होते. लँडिंग व्हील उघडले नाही किंवा तुटले तरी देखील अपघात होऊ शकतो. चुकीच्या कोनात किंवा खूप वेगवान किंवा मंद गतीने विमान उतरवणे देखील धोकादायक आहे. धावपट्टीवर अडथळे असणे आणि इंधनाचा अभाव यामुळे देखील विमान उड्डाण किंवा लॅंडिगमध्ये उडचणी निर्माण होऊ शकतात.