Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २७ राज्यांच्या बैठकीत रस्ते सुरक्षिततेबाबत मोठे निर्णय घेतले. अपघातग्रस्तांना १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार आणि मदत करणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीस मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 08, 2026 | 09:42 PM
नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार (Photo Credit- X)

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • नितीन गडकरींचा मोठा निर्णय
  • रस्ते अपघातग्रस्तांना १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार
  • मदत करणाऱ्या ‘राहवीरांना’ मिळणार २५ हजारांचे बक्षीस
Road Accident News: देशातील रस्ते सुरक्षा, परिवहन सुधारणा आणि नागरिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत २७ राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची एक महत्त्वाची राष्ट्रीय बैठक पार पडली. या बैठकीत रस्ते अपघातातील मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि जखमींना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी अनेक मोठ्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

१.५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ‘कॅशलेस ट्रीटमेंट स्कीम’. आता देशातील कोणत्याही रस्त्यावर अपघाताचा बळी ठरलेल्या व्यक्तीला अपघातानंतरच्या पहिल्या ७ दिवसांपर्यंत १.५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत (कॅशलेस) उपचार मिळतील. यापूर्वी ही योजना आसाम, चंदीगड, पंजाब आणि हरियाणा यांसारख्या राज्यांत यशस्वी ठरली असून, आता ती संपूर्ण देशात लागू केली जात आहे.

🚨 India will launch a cashless treatment scheme for road accident victims—Nitin Gadkari. Under this scheme, the victims are entitled to cashless treatment up to Rs 1.5 lakh per victim per accident for a maximum period of 7 days from the date of the accident. pic.twitter.com/7lVy8fDSIl — Indian Tech & Infra (@IndianTechGuide) January 8, 2026

मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचवणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अशा व्यक्तींना आता ‘राहवीर’ म्हटले जाईल आणि त्यांना सरकारकडून २५,००० रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल.

हिट अँड रन प्रकरणांत वाढीव भरपाई

‘हिट अँड रन’ प्रकरणांमधील नुकसानभरपाईच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. आता गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला ५०,००० रुपये आणि मृत्यू झाल्यास वारसांना २ लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे. सध्या अशा प्रकरणांत क्लेम दाखल होण्याचे प्रमाण केवळ १७% असल्याने, राज्यांनी या योजनेबाबत अधिक जागरूकता पसरवावी, असे निर्देशही गडकरी यांनी दिले.

Nagpur News: नागपूरची सिलिंडरमुक्तीकडे वाटचाल; नितीन गडकरींकडून HCGच्या CGS कम मदर स्टेशनचे उद्घाटन

बसेससाठी नवीन ‘बॉडी कोड’ आणि सुरक्षितता

गेल्या तीन महिन्यांत झालेल्या भीषण बस अपघातांनंतर सरकारने बसच्या डिझाइनबाबत कठोर नियम लागू केले आहेत. आता स्लीपर कोच बसेस केवळ नामांकित ऑटोमोबाईल कंपन्याच बनवू शकतील. सर्व बसेसमध्ये फायर डिटेक्शन, इमर्जन्सी एक्झिट, लायटिंग आणि ड्रायव्हरसाठी ‘ड्राउझीनेस अलर्ट’ (झोप येत असल्यास इशारा देणारी यंत्रणा) अनिवार्य असेल. शहरातील सर्व नवीन बसेस ‘लो-फ्लोर’ असतील, ज्यात रॅम्प, लिफ्ट आणि व्हीलचेअरची सोय असेल.

तंत्रज्ञान आणि भविष्यातील सुधारणा

नितीन गडकरी यांनी वाहनांच्या सुरक्षिततेसाठी V2V (व्हीकल-टू-व्हीकल) कम्युनिकेशन तंत्रज्ञानावर भर दिला आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहने एकमेकांना ‘रियल टाइम’ माहिती देऊन ८० टक्क्यांपर्यंत अपघात रोखू शकतील. तसेच, आगामी संसद सत्रात मोटर वाहन कायद्यात (Motor Vehicle Act) ६१ नवीन सुधारणा प्रस्तावित केल्या जाणार आहेत.

‘झिरो फेटॅलिटी’ जिल्ह्यांचे लक्ष्य

देशातील सर्वाधिक अपघात होणाऱ्या १०० जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे. या जिल्ह्यांमध्ये ‘झिरो फेटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ प्रोग्राम राबवला जाणार आहे. यामध्ये स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला जाईल.

Nagpur News: ईबीजी ग्रुप Adhira and Appa Cafe चे 100 आउटलेट्स भारतात उभारणार

Web Title: Nitin gadkari announces cashless treatment for road accident victims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • Nation News
  • Nitin Gadkari
  • Road Accident

संबंधित बातम्या

“इतके अर्ज तर माणसांसाठीही येत नाहीत…”, भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आश्चर्य
1

“इतके अर्ज तर माणसांसाठीही येत नाहीत…”, भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आश्चर्य

शेणाने रंगवलेल्या भिंती; फराह खानने उघड केला नितीन गडकरींच्या घराचा वेगळा पैलू, पाहा Video
2

शेणाने रंगवलेल्या भिंती; फराह खानने उघड केला नितीन गडकरींच्या घराचा वेगळा पैलू, पाहा Video

नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये
3

नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.