Noida Fake adulterated Paneer 550 KG destroy in delhi police news
Noida adulterated Paneer: नोएडा : दिवाळीचा सण जवळ येऊ लागताच बाजारातून खरेदी करण्याचे प्रमाण वाढते. सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मिठाई किंवा पदार्थ तयार करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांची खरेदी केली जाते. याचाच फायदा अनेकदा काही उपद्रवी लोक उचलताना दिसून येतात. नोएडामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नोएडामध्ये भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पनीर आढळून आले आहे. (FSSAI) ने तब्बल 550 किलो भेसळयुक्त पनीर नष्ट केले.
दिवाळीच्या सणामुळे बनावटगिरी आणि भेसळयुक्त लोकांवर वचक बसवण्यासाठी प्रशासन यंत्रणा कामाला लागले. नोएडामध्ये एक आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन (FSSAI) ने ५५० किलो भेसळयुक्त पनीर जप्त करून नष्ट केली. हे पनीर हरियाणातील मेवात (हथिन) येथील जंगी मिल्क प्लांटमधून दिल्ली-एनसीआरला पुरवण्यासाठी आणले जात होते. तपासात असे दिसून आले की पनीर दुर्गंधीयुक्त होते. यामुळे दिल्लीमधील खाद्यपदार्थ आणि मिठाईंबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
११-१२ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री तपासणी मोहिमेदरम्यान, अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने सेक्टर ८१ मधील भांगेल गावाजवळ एक संशयास्पद बोलेरो गाडी थांबवली. गाडीत मोठ्या प्रमाणात पनीर भरलेले होते. ते खराब झालेले आणि त्यातून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह तपासणी पथकाने ताबडतोब पनीर मानवी वापरासाठी अयोग्य असल्याचे निश्चित केले. पथकाने घटनास्थळावरून नमुने गोळा केले आणि ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले. नोएडा प्राधिकरणाच्या मदतीने दुसऱ्या दिवशी सकाळी, १२ ऑक्टोबर रोजी नष्ट करण्यापूर्वी सुमारे ५५० किलो पनीर जप्त करून भांगेलमधील न्यू गढवाल डेअरीमध्ये सुरक्षितपणे साठवण्यात आले.
NOIDA : नोएडा खाद्य विभाग की बड़ी कार्रवाई 550 किलो नकली पनीर किया नष्ट , पनीर खाने से पहले इसको जरूर देखें ! नोएडा के सेक्टर 81 भंगेल गाँव में बोलेरो गाड़ी को खाद्य विभाग ने जाँच के लिए रोका बोलेरो गाड़ी में भारी मात्रा में घटिया पनीर रखा हुआ था जिसमे काफ़ी बदबू आ रही थी,… pic.twitter.com/FF4W0jZa5D — Mahender Mahi (@MahendrMahii) October 12, 2025
सणासुदीच्या काळात बनावट पनीर आणि खवा बनवण्यासाठी रसायने आणि डिटर्जंट्सचा वापर केला जात आहे. हे पनीर खरे असल्यासारखे दिसत असले तरी, कमी किमतीत, जलद तयारी प्रक्रिया आणि दीर्घकाळ टिकण्यामुळे दुकानदार ते पसंत करतात. तज्ज्ञांच्या मते, हे बनावट पनीर शरीरात संसर्ग, पोटदुखी आणि यकृताशी संबंधित आजारांना आमंत्रित करु शकते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कच्छमध्ये बनावट कोलगेट कारखाना
गुजरातमधील कच्छमध्ये गोदोद्दार पोलिसांनी रापर तालुक्यातील चित्राड भागातील बनावट कोलगेट टूथपेस्ट बनवल्या जाणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. चार संशयितांना अटक करण्यात आली असून लाखो रुपयांच्या बनावट वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये अगदी हुबेहुब वाटले अशा पद्धतीचे कोलगेट कंपनीचे टूथपेस्ट तयार केले जात आहे. जेव्हा पोलिस कारखान्यात पोहोचले तेव्हा त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. गुजरातमधील या बनावट कंपनीतून तब्बल 9 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.