रवींद्र धंगेकर यांनी भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याने महायुतीमध्ये वाययुद्ध सुरु झाल्याचे दिसून आले (फोटो - सोशल मीडिया)
Ravindra Dhangekar On Chandrakant Patil : पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आलेल्या असताना पुण्यामध्ये राजकीय वांदग निर्माण झाला. महायुतीमध्ये अंतर्गत कलह वाढला असून जोरदार वाद-विवाद सुरु आहे. निलेश घायवळ प्रकरणामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेल्या रवींद्र धंगेकर यांनी विकासाच्या मुद्द्यावरुन अनेकदा भाजप नेत्यांवर निशाणा साधला. मात्र आता शिवसेना शिंदे गटामध्ये असताना देखील रवींद्र धंगेकर टीका करत असल्यामुळे धंगेकर हे महायुतीला पुण्यात भारी पडत असल्याच्या चर्चा आहेत.
माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील विकास, गुन्हेगारी यासारख्या अनेक मुद्द्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. निलेश घायवळ प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत,जे आजबाजूला सपोर्टिंगला आहेत, ज्यांच्यामुळे वर्षानुवर्ष कोथरुड परिसरात गुन्हेगारी वाढतेय, त्यावर मी बोलत होतो, असे म्हणत पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरांनी निशाणा साधला आहे.
ते या भागाचे आमदार आणि मंत्री आहेत त्यांनाच प्रश्न आम्ही विचारणार ना!
रवींद्र धंगेकर माध्यमांसमोर म्हणाले की, निलेश घायवळ प्रकरणात जे जे दोषी आहेत, हे पाठीशी घालत आहेत. त्या विषयी मी बोलत आहेत. पुणे भयमुक्त झालं पाहिजे आणि पोलिसांवर नामुष्की आली आहे. याला जबाबदार हे चंद्रकात पाटील यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते जबाबदार आहेत. त्या भागात आमदार आणि मंत्री आहेत त्यांनाच प्रश्न आम्ही विचारणार ना! मी पुणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारतो आहे, अशा शब्दांत रवींद्र धंगेकर यांनी भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील आरोपाचे स्पष्टीकरण दिले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, निलेश घायवळ आणि मी वाऱ्याला पण एकत्र येणार नाही . चंद्रकात पाटील यांना प्रश्न विचारल्यावर समीर पाटलांना राग आला . सांगलीत समीर पाटील याच्यावर काय काय गुन्हे दाखल आहेत ते मी दाखवले. घायवळ टोळीला पोषक वातावरण समीर पाटील तयार करत असतो. भाजप माझ्यावर टिकेचा भडिमार करत आहे. गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी कुणी माझ्याशी बोलत नाही. पोलीस म्हणाले की तुमच्यावर गुन्हे दाखल करायची तयारी झाली आहे. पोलीस म्हणाले की तुमच्यावर गुन्हे दाखल करायची तयारी झाली आहे, असे शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
भाजपच्या सोशल मीडियावरून मला ट्रोल
पुण्यामध्ये महायुतीमध्ये वाकयुद्ध सुरु झाल्यामुळे रवींद्र धंगेकर यांना पक्षश्रेष्ठींकडून तंबी देण्यात आली. प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांसोबत संवाद साधला. याबाबत धंगेकर म्हणाले की, एकनाथ शिंदे म्हणाले तुम्ही वाद होईल असे बोलू नका. पण मी फक्त प्रश्न विचारले आहेत. भाजपच्या सोशल मीडियावरून मला ट्रोल केल जात आहे. तुम्ही माझ्या कुटुंबावर आला आहात, मी कधी तुमच्या कुटुंबावर आलो नाही. मग तसे करणार नाही कधी कारण ती आमची संस्कृती नाही. माझ्या लहान मुलावर हल्ला केला जातो आहे पण माझ्यावर जी कारवाई होईल, ती भोगायला तयार आहे. मी कधी बेरजेचे राजकारण केले नाही. माझ्या कुटुंबाच नुकसान झालं अन् ते भाजपच्या लोकांनी हे सगळं केलं आहे. माझं घर उध्वस्त झालेले आहे, पण मागे हटलो नाही. माझी भूमिका मी त्यांना काल सांगितली आहे. ते म्हणाले गुन्हेगारी संपली पाहिजे, यात लक्ष घालेल असे ते (एकनाथ शिंदे) म्हणाले. त्यांच्या बोलण्याने मला अभिमान आहे, अशा भावना रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवारांचं कोण ऐकतं का?
पुढे रवींद्र धंगेकर म्हणाले की, “चंद्रकात पाटील यांच्या मार्फत माझ्यावर मोक्का लावण्यासाठी समीर पाटील हा पोलिसांसोबत तयारी करतो आहे.माझ्या मुलाच्या हातात खेळण्याची बंदूक होती. पुणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे, ही माझी भूमिका माझ्या भूमिकेला एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे. अजित पवार माझे नेते आहेत पण त्यांचं कोण ऐकत का. चंद्रकांत पाटील यांना एकदा सगळं कुटुंब घेऊन जाऊन भेटणार आणि आमच्यावर अन्याय का केला? असं विचारणार. भाजप मधला स्वाभिमानी गट मला मदत करत आहेत. त्यांना वाटतं की, मी त्यांची भाषा बोलतो म्हणून ते मदत करतात, असे धक्कादायक विधान रवींद्र धंगेकर यांनी केले.