Boxer Vijender Singh joins BJP : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बॉक्सिंगमधील भारताचे पहिले ऑलिम्पिक मेडल विजेता विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
#WATCH | Boxer & Congress leader Vijender Singh joins BJP at the party headquarters in Delhi#LokSabhaElections2024 pic.twitter.com/5fqOt9KIcp — ANI (@ANI) April 3, 2024
विजेंदर सिंग यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक दक्षिण दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली होती, पण तेथे त्यांचा पराभव झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे नाव मथुरा येथून पक्षाचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, जिथून अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा निवडणूक लढवत आहेत.






